१५ मदरशांना अनुदान मंजूर
By Admin | Updated: August 3, 2014 01:13 IST2014-08-03T00:34:12+5:302014-08-03T01:13:04+5:30
कळमनुरी : डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत जिल्ह्यातील १५ मदरशांना ४८ लाख ८० हजारांचे अनुदान शासनाने मंजूर केले आहे.

१५ मदरशांना अनुदान मंजूर
कळमनुरी : डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत जिल्ह्यातील १५ मदरशांना ४८ लाख ८० हजारांचे अनुदान शासनाने मंजूर केले आहे.
मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत राज्यातील २७४ मदरसांना ९ कोटी २१ लाख ६१ हजार ८५९ रुपयांचा निधी शासनाने २०१४-१५ या वर्षासाठी मंजूर केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेल्या अर्जांची छाननी करून पात्र मदरशांची यादी शिफारशी व आवश्यक निधीच्या मागणीसह शासनाकडे पाठविली होती. जिल्हाधिकारी मदरशाच्या राष्ट्रीयीकृत बँकेतील खात्यामध्ये इ.सी.एस.द्वारे रक्कमा जमा करतील. मदरशांनी अनुदान प्राप्त होताच तीन महिन्याच्या आत प्रस्तावात नमूद केलेले कामे करणे आवश्यक आहे. नंतर उपयोगिता प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावे, या योजनेंतर्गत उद्भवणाऱ्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती तक्रार करण्यात आली आहे. नोंदणीकृत मदरशांना पायाभूत सुविधा आणि विशेष शिक्षकांच्या वेतनाकरिता सहाय्यक अनुदान या लेखाशिर्षखाली मंजूर करण्यात आलेले अनुदानातून भागविण्यात यावा, मदरशांना वितरित करण्यात आलेले अनुदान पायाभूत सुविधा, ग्रंथालय, शिक्षकांचे मानधन यावर खर्च करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील दानिश वेलफेअर सोसायटी, हिंगोली, मदरसा ईकरा वसमत, खाजा गरीब नवाज कुरूंदा, दर्गाह ए-सुमाणी वसमत, दारुल उलूम सिरेहक रजाए मुस्तफा वसमत, जामिया रहेमानिया हिंगोली, राबीया बसरा वसमत, मदरसाए आयशा सिद्दीकी औंढा नागनाथ दारुल उलूम गौसिया अरबीया, कळमनुरी, मिव्हाजुल उलूम रहेमाननिया औंढा नागनाथ, युसूफ मदरसा हिंगोली, अलाउद्दीन मदरसा आंधारवाडी, मदरसा अलहुदा वसमत, मदरसा ए अजुमन आखाडा बाळापूर, उमर बिन खताब वसमत या १५ शाळांना निधी मंजूर करण्यात आला आहे. (वार्ताहर)