शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीत १५ तासांची पाणी कपात; आता होणारा रोटेशननुसार पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 17:32 IST

उद्योगांच्या उत्पादनाला फटका बसणार आहे.

ठळक मुद्देउद्योगांवर होणार परिणाम  वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, जालना औद्योगिक वसाहतीला फटका

औरंगाबाद/ वाळूज महानगर : दुष्काळामुळे औद्योगिक वसाहतींचा १५ तासांनी पाणीपुरवठा कपात करण्याची वेळ आली आहे. उद्योग व निवासी क्षेत्रातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एमआयडीसीने तयार केले आहे. यामुळे वाळूजसह शेंद्रा, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतींतील उद्योगांच्या उत्पादनाला फटका बसणार आहे. या निर्णयापूर्वी कुठे २४, तर कुठे १८ किंवा १३ तास उद्योगांना पाणीपुरवठा होत असे, आता ५ ते ३ तासच पाणीपुरवठा होणार आहे.

विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार एमआयडीसीने धरणातील उपलब्ध साठ्याचे नियोजन करून उद्योगांसह निवासी क्षेत्रातील पाणीपुरवठ्याची वेळ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योगांचे पाणी कमीत कमी कपात करण्यात येईल, असे सांगितले होते. वाळूज महानगरातील निवासी क्षेत्राला पहाटे ५ ते दुपारी १ व वाळूज औद्योगिक क्षेत्राला दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या वेळेत पाणीपुरवठा केला जाणार आहे. याचप्रमाणे चिकलठाणा औद्योगिक क्षेत्राला सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत फक्त ३ तास, शेंद्रा औद्योगिक क्षेत्राला पाणी उपलब्धतेनुसार ३ तास, औरंगाबाद औद्योगिक क्षेत्राला सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत, तर औरंगाबाद नागरी वसाहतीला सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, तसेच जालना औद्योगिक क्षेत्राला पाणी उपलब्धतेनुसार दररोज ३ तास पाणी दिले जाणार आहे. 

एमआयडीसीकडून वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, जालना औद्योगिक वसाहतीला, तसेच वाळूज महानगरातील अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. गेल्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने जायकवाडीत पुरेसा जलसाठा होऊ शकला नाही. दुष्काळामुळे जिल्ह्यातील १२ लाख लोकसंख्येला पाणीटंचाई निर्माण झाल्याने टँकरने पाणी द्यावे लागत आहे. एमआयडीसीच्या वाळूज, शेंद्रा येथील जलकुंभावरून ग्रामीण भागासह मनपाला टँकरने पाणी द्यावे लागत आहे. सध्या जायकवाडीतील मृतसाठ्यातून उद्योगासह निवासी क्षेत्राला पाणीपुरवठा होत आहे. 

उद्योगांवर होणार परिणाम वाळूज औद्योगिक क्षेत्रात पाण्यावर अवलंबून असलेले ५ ते १० टक्के मद्य, बीअर, औषधी कंपन्या आहेत. तसेच अनेक कोटिंग उद्योगांना तापमान थंड करून ठेवण्यासाठी पाण्याची गरज असते. या उद्योगावर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ४अनेक गावांना लोकसंख्येच्या प्रमाणात कमी पाणी मिळत असल्याने अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यातही एमआयडीसीने निवासी क्षेत्राच्या पाणीपुरवठा वेळेत कपात केली आहे. नागरी वसाहतीत आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण होणार आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीAurangabadऔरंगाबादWaterपाणीdroughtदुष्काळ