वाळू उपसाप्रकरणी १५ दिवसानंतर गुन्हा
By Admin | Updated: May 22, 2015 00:30 IST2015-05-22T00:14:43+5:302015-05-22T00:30:39+5:30
जालना : घनसावंगीचे तहसीलदारांनी ६ मे रोजी केलेल्या दौऱ्यात राजाटाकळी येथे अवैध वाळू वाहतुक करणारे चार टिप्पर व ट्रॅक्टर तसेच चार जणांनी अवैध वाळूचा साठा केल्याचे आढळून आले होते.

वाळू उपसाप्रकरणी १५ दिवसानंतर गुन्हा
जालना : घनसावंगीचे तहसीलदारांनी ६ मे रोजी केलेल्या दौऱ्यात राजाटाकळी येथे अवैध वाळू वाहतुक करणारे चार टिप्पर व ट्रॅक्टर तसेच चार जणांनी अवैध वाळूचा साठा केल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी १५ दिवसानंतर पाच जणांसह पाच वाहनांवर घनसावंगी पोलस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घनसावंगीचे तहसीलदार ६ मे रोजी दौऱ्यावर असताना त्यांना राजाटाकळी येथील चार जणांकडे अवैध वाळूचा साठा आढळून आला होता. तसेच अवैध वाळू वाहतुकीचे चार टिप्पर व एक ट्रॅक्टर वाळू घेवून जातांना दिसले. मात्र ते सकाळच्या अंधारामुळे न थाबता निघून गेले होते. या प्रकरणी गुरूवारी मंडळ अधिकारी दिलीप गोमराजे यांच्या फिर्यादी वरून विनायक पंडित आर्दड, रमेश माणिक आर्दड, दत्ता निवृत्ती आर्दड, तुकाराम नाथा आर्दड याचार जणा सह टिप्पर क्र एम.एच. २१ एक्स २५३४, एम.एच. २१ एल ७८७७, एम.एच. ०४ डी. ३२७२, एम.एच. २१ -६७८६, ट्रॅक्टर क्र एम.एच ३७ ए. ५९४९ विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इसमाचा मृत्यू
जालना - शोलाचौक येथील रहिवाशी भरत पंढरीनाथ कोनवदे (५५) यांचा आज दुपारी मृत्यू झाला. मृत्यूचे कारण समजू शकले नाही. (प्रतिनिधी)