घरांच्या दुरुस्तीसाठी दीड कोटींचे अनुदान
By Admin | Updated: April 16, 2017 23:11 IST2017-04-16T23:09:17+5:302017-04-16T23:11:33+5:30
लातूर : गत पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीबरोबर घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

घरांच्या दुरुस्तीसाठी दीड कोटींचे अनुदान
लातूर : गत पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीबरोबर घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचा सर्व्हे करून मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. या मदतीपोटी जिल्ह्यास १ कोटी ४६ लाख ५३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध झाले असून, ते तालुक्यांना वितरीत करण्यात आले आहे.
गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे शेतीबरोबर घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान औसा, रेणापूर, उदगीर, अहमदपूर, जळकोट या तालुक्यांमध्ये झाले. या नुकसानीचे पंचनामे तलाठ्यांमार्फत करण्यात येऊन सदरील प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या नुकसानीपोटी जिल्ह्यास नैसर्गिक आपत्ती निवारणासाठीच्या साह्य योजनेतून शासनाकडून निधी उपलब्ध झाला आहे. (प्रतिनिधी)