१५ अंगणवाड्यांची आयएसओ तपासणी

By Admin | Updated: August 9, 2014 00:37 IST2014-08-08T23:39:50+5:302014-08-09T00:37:43+5:30

बालाजी पडोळे , शिरूर ताजबंद एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या तालुका प्रकल्प कार्यालयांतर्गत १५ अंगणवाडी केंद्रांची आयएसओ तपासणी गुरुवारी पूर्ण करण्यात आली आहे़

15 Anganwadi's ISO checks | १५ अंगणवाड्यांची आयएसओ तपासणी

१५ अंगणवाड्यांची आयएसओ तपासणी


बालाजी पडोळे , शिरूर ताजबंद
एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या तालुका प्रकल्प कार्यालयांतर्गत १५ अंगणवाडी केंद्रांची आयएसओ तपासणी गुरुवारी पूर्ण करण्यात आली आहे़ त्यामुळे आता अंगणवाड्यांना आयएसओ नामांकनाची प्रतीक्षा लागली आहे़
एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पांतर्गत चालू वर्षासाठी तालुक्यातील १८ अंगणवाड्यांची आयएसओ नामांकनासाठी निवड करण्यात आली होती़ त्यापैकी पंधरा अंगणवाडी केंद्रांची पाहणी औरंगाबादच्या प्रशांत जोशी यांच्या पथकाने केली आहे़ या पथकात नितीन पाटील, अजय पाटील, राजेश पालवे, गोपाळ यादव यांचा समावेश होता़ या पथकाने अहमदपूर प्रकल्पातील लांजी, मावलगाव, केंद्रेवाडी, शिरूर ताजबंद, उमरगा कोर्ट, वळसांगवी, शिवनखेड, धानोरा बु़, सताळा, मोळवण, सांगवी सुनेगाव, महादेववाडी, टेंभूर्णी, थोरलीवाडी येथील अंगणवाड्यांचा समावेश आहे़ या पथकाने अंगणवाडीतील भौतिक सुविधा पूर्व प्राथमिक शिक्षण दर्जाची तपासणी केली़ त्याचबरोबर गरोदर, स्तनदा माता तसेच किशोरी मुलींच्या सुविधेसंदर्भात मुलाखती घेतल्या़
यावेळी गटविकास अधिकारी नितीन दाताळ, बालविकास प्रकल्प अधिकारी सुधीर मांजरमकर, सरपंच साहेबराव जाधव, एक़े़ पाटील, एल़आऱपाटील, ए़एऩआकनगिरे, एस़एम़आढाव, सचिन काडवदे, शिवाजी पिचकेवार, किशन सुवर्णकार आदी उपस्थित होते़

Web Title: 15 Anganwadi's ISO checks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.