निराधारांचे १४८१ प्रस्ताव मंजूर
By Admin | Updated: August 17, 2014 00:55 IST2014-08-17T00:38:50+5:302014-08-17T00:55:02+5:30
भूम : संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत २ हजार १२ प्रस्ताव दाखल झाले होते. १३ आॅगस्ट रोजी झालेल्या बैठकीत यापैकी १ हजार ४८१ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.

निराधारांचे १४८१ प्रस्ताव मंजूर
भूम : संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत २ हजार १२ प्रस्ताव दाखल झाले होते. १३ आॅगस्ट रोजी झालेल्या बैठकीत यापैकी १ हजार ४८१ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे निराधारांना दिलासा मिळाला आहे.
संजय गांधी निराधार योजनेसाठी ८ जानेवारी २०१४ पासून तालुकाभरातून जवळपास २ हजार १२ प्रस्ताव आले होते. १३ आॅगस्ट रोजी झालेल्या बैठकीत त्यापैकी १ हजार ४८१ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले. त्यामुळे ५३० प्रस्ताव विविध त्रुटींमुळे नामंजूर केले आहेत. यामध्ये संजय गांधी योजनेसाठी दाखल झालेल्या १७७ पैकी १३५ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. इंदिरा गांधी योजनेसाठी १ हजार १३३ प्रस्ताव आले होते. त्यापैकी ७४३ प्रस्तावांना मंजुरी मिळाली.
श्रावणबाळ योजनेसाठी ७०१ प्रस्ताव आले होते. त्यापैकी ६०४ मंजूर झाले. यातील अनेक लाभार्थ्यांनी सात ते आठ महिन्यांपूर्वी प्रस्ताव दाखल केले होते. लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेमुळे मंजुरीला विलंब झाला होता. बैठकीला तहसीलदार अरविंद बोळंगे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अॅड. सुंदरराव हुंबे, सदस्य विलास शाळु, उपाध्यक्ष संजय पाटील, गटविकास अधिकारी टी. बी. उगलमोगले, पांडुरंग उगलमोगले आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)