९0 उमेदवारांचे १४७ अर्ज
By Admin | Updated: September 27, 2014 23:18 IST2014-09-27T23:15:15+5:302014-09-27T23:18:37+5:30
हिंगोली : विधानसभा निवडणुकीसाठी २७ सप्टेंबरपर्यंत ४० उमेदवारांनी ५९ नामनिर्देश अर्ज दाखल केले आहेत.

९0 उमेदवारांचे १४७ अर्ज
हिंगोली : विधानसभा निवडणुकीसाठी २७ सप्टेंबरपर्यंत ४० उमेदवारांनी ५९ नामनिर्देश अर्ज दाखल केले आहेत. २६ सप्टेंबरपर्यंत ३० नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये २७ सप्टेंबर २३ उमेदवारांनी २९ नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत.
२९ नामनिर्देशन अर्जांपैकी केशव कोंडजी अवचार (अपक्ष), शाहीखाँ मुजफरखाँ पठाण (अपक्ष), सय्यद युनुस सय्यद हामीज(अपक्ष), इम्रान ताजीर खान (अपक्ष), दिलीप बाबूराव चव्हाण (राष्ट्रवादी कॉंग्रेस), बाबूराव लक्ष्मण इंगोले (अपक्ष), त्र्यबंक तुळशीराम सावंत (बहुजन मुक्त पर्टी), साहेबराव किसन सिरसाट (बहुजन समाज पर्टी), प्रकाश सुभाना दिपके (बहुजन समाज पर्टी), दिवाकर माणिकराव माने (रिपाई-आठवले), धम्मदीपक बळीराम खंदारे (भारिप बहुजन महासंघ ), दिलीप बालासाहेब नायक (अपक्ष), दिनकर प्रल्हादराव देशमुख (शिवसेना), गुलाब कुंडलिक खंदारे (रिपाइं), बबन गणपतराव शिखरे (लालसेना), इमाम खाँ आजम खाँ पठाण (अपक्ष), सुरेश नारायण वाढे (रिपाइं), तानाजी सखाराम मुटकुळे (भाजपा), ओमप्रकाश गोविंदराव कोटकर (मनसे), विनोद नानाराव नाईक (बहुजन समाज पार्टी), प्रकाश बळीराम शिंदे (हिंदुस्थान जनता पार्टी), उत्तम मारोती धाबे (स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष), दिलीप किसनराव खंदारे (बहुजन समाज पर्टी) यांनी नामनिर्देशन अर्ज २७ सप्टेंबर २०१४ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी खुदाबक्ष तडवी यांच्याकडे सादर केले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विद्याचरण कडवकर यांनी दिली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
कळमनुरीत २७ उमेदवारांचे ४९ अर्ज दाखल
कळमनुरी : विधानसभा निवडणुकीसाठी २७ उमेदवारांनी ४९ अर्ज दाखल केलेले आहेत. २७ सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. २७ सप्टेंबर रोजी नागोराव करंडे यांनी दोन, अर्ज अनंतकुमार पाटील यांचे दोन, भागोराव नरसिंग राठोड यांनी काँग्रेसकडून, गजानन घुगे यांनी एक सेना व दोन अपक्ष असे एकूण तीन, संतोष टारफे यांचे एक काँग्रेस व दोन अपक्ष असे एकूण तीन, रमेश देवराव मस्के यांचे एक सेनेकडून व एक अपक्ष असे दोन अर्ज, इमरान खान मन्नानखान (अपक्ष) यांचे दोन अर्ज तर रवींद्र वाढे यांनी भारिप बहुजन महासंघाकडून दोन अर्ज भरले आहेत. याशिवाय विश्वनाथ खुडे (रिपाई), चंद्रमुनी पाईकराव (बहुजन मुक्ती पक्ष), सुनील अडकिणे (मनसे), अॅड. माधवराव नाईक (भाजप-रासप), स. खदीर स. मस्तान (अपक्ष), सत्तारखाँ पठाण (अपक्ष) यांचे दोन अर्ज दाखल झाले असून अमृतराव शंकरराव बोथीकर यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांनी अर्ज स्वीकारले. यावेळी तहसीलदार कृष्णकांत चिकुर्ते, के.एम. विरकुंवर, व्ही.बी. सेवनकर, शिवाजी पोटे, वहिद खान आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
उमेदवारी अर्जाची छाननी २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुराधा ढालकरी यांनी दिली.
वसमतमध्ये २० उमेदवारांचे ३९ अर्ज दाखल
वसमत : वसमत विधानसभा मतदारसंघासाठी एकूण २० उमेदवारांनी ३९ अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या अखरेच्या दिवशीपर्यंत शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी या चारही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज पक्षाच्या अधिकृत बी फॉर्मसह दाखल झाले होते. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुराधा ढालकरी, तहसीलदार अरविंद नरसीकर यांनी दिली. वसमतमध्ये अर्ज भरलेले उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत. आ. जजयप्रकाश दांडेगावकर (राष्ट्रवादी), डॉ. जयप्रकाश मुंदडा (शिवसेना), अॅड. शिवाजीराव जाधव (भाजपा), अ. हफीज अ. रहेमान (काँग्रेस), कैलास निकाळजे (आरपीआय व अपक्ष), आनंद करवंदे (बहुजन समाज पार्टी व अपक्ष), सतीश बागल (अपक्ष), इफ्तेखार म. जब्बार (भारिप व अपक्ष), मीनाक्षी गिते (बहुजन मुक्ती पार्टी), बाबासाहेब सुतारे (अपक्ष), दिगांबर नाईकवाडे (अपक्ष) दिपक सदावर्ते (भारीप व अपक्ष), शिवाजी लक्ष्मण जाधव (अपक्ष), भारत बळवंते (अपक्ष), आबाजी गायकवाड (रिपब्लिकन सेना व अपक्ष) प्रशांत गायकवाड (भारतीय काँग्रेस), शेख जहांगीर शेख खाजा (बहुजन समाज पार्टी), गोपीनाथ सरोदे (अपक्ष), शेख सुभान अली (वेलफेअर पार्टी), राहुल ढेंबरे (अपक्ष), प्रल्हाद जोंधळे (रिपब्लिकन सेना व अपक्ष) रविकिरण वाघमारे (अपक्ष), जुनेदखाँ पठाण (अपक्ष), डॉ. भगवान चामले (राष्ट्रीय किसान पार्टी) यांचे अर्ज दाखल झाले आहेत. (वार्ताहर)
टारफे यांचा शक्तिप्रदर्शनासह अर्ज
कळमनुरी : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार डॉ. संतोष टारफे यांनी २७ सप्टेंबर रोजी शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांच्याकडे सादर केला. हजारो समर्थकांसह जयहो च्या गजरात रॅली काढून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. यावेळी खा. राजीव सातव, संजय बोंढारे, नगराध्यक्षा यास्मीनबी, दिलीप देसाई, नंदकिशोर तोष्णीवाल, डॉ. सतीश पाचपुते, केशव मस्के, सदाशिव जटाळे आदी उपस्थित होते. येथील सामाजिक सभागृहाच्या मैदानात रॅलीचा समारोप करण्यात आला. येथे मान्यवरांची भाषणे झाली.
भाजपातर्फे मुटकुळे यांचा अर्ज
हिंगोली : हिंगोली विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या वतीने २७ सप्टेंबर रोजी दुपारी १.५० वाजता तानाजी मुटकुळे यांनी शक्तिप्रदर्शनासह अर्ज दाखल केला. याप्रसंगी नांदेड नाका, जवाहर रोड, अकोला रोड या मार्गावर रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर रॅलीचे उस्मानशाही मिल येथे सभेत रुपांतर झाले. अध्यक्षस्थानी हिंगोली जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर, रा.स.प. जिल्हाध्यक्ष डॉ. वसंत मस्के हे उपस्थित होते. तर दुर्गादास साकळे, गोवर्धन विरकुंवर, अॅड. प्रभाकर भाकरे, डॉ. पुंजाजी गाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मिलिंद यंबल, मनोज जैन, माणिकराव भिंगीकर, बी.डी. बांगर, नगरसेवक गणेश बांगर, आदींची उपस्थिती होती.
जाधवांचा शक्तिप्रदर्शनासह अर्ज
वसमत : वसमत विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार अॅड. शिवाजीराव जाधव यांनीही शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आज पक्षाच्या बी फार्मसह अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी माजी खा. सुभाष वानखेडे, भाजप नेत्या उज्वला तांभाळे, नगराध्यक्ष भगवान कुदाळे, माजी नगराध्यक्ष शिवदास बोड्डेवार, प्रकाश भोसले, श्रीकांत देशपांडे, प्रभाकर रेंगे, बालाजी क्षीरसागर, बालाजी जाधव, नाथराव कदम, सुनील कारले, सत्यविजय अन्वेकर, प्रल्हाद इंगोले, मन्मथ बेले, शिवाजी अलडिगे, किशनराव देवरे यांच्यासह मोठ्यासंख्येने भाजपाचे पदाधिकारी नगरसेवक, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. मित्रपक्षाचे पदाधिकारी- कार्यकर्तेही हजर होते.
चव्हाण यांची उमेदवारी दाखल
हिंगोली : विधानसभेसाठी राष्ट्रवादी पक्षाकडून दिलीप चव्हाण यांनी सकाळी ११.१५ वाजता उमेदवारी दाखल केली. त्यानंतर चव्हाण यांच्या घरापासून रॅली काढण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी भवनमध्ये रॅलीचा समारोप झाला. आ. रामराव वडकुते यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी हा सर्वांना सामावून घेणारा पक्ष असल्याचे सांगितले. तर दिलीप चव्हाण यांनी याप्रसंगी शहराप्रमाणे ग्रामीण भागातील सिंचन, बेरोजगारी व रस्त्याच्या समस्या, पाण्याची सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले. माजी खा. शिवाजी माने, जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, नगराध्यक्षा अनिता सुर्यतळ, शेख नेहाल, अनिल पतंगे, जगजित खुराणा, शरद जयस्वाल, बिरजू यादव, शकील, अनिल नैनवाणी, बाबू कदम, अॅड. भुक्तर, हरिफ लाला, जि.प. सदस्य केशव नाईक, मनीष आखरे, माधव कोरडे, संजय दराडे, पं.स. सभापती नामदेव राठोड, अॅड. स्वप्निल गुंडेवार, आप्पासाहेब देशमुख, राजू पाटील, रवी गडदे, भरत जगताप, भास्करराव देशमुख, अशोक श्रीरामे, श्यामराव गुजर, विलास जाधव, संतोष दळवी, कैलास देशमुख, मुन्ना देशमुख, भानुदास टेकाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोटकर यांची उमेदवारी दाखल
हिंगोली : मनसेचे उमेदवार ओमप्रकाश कोटकर यांचा शक्तिप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हाध्यक्ष बंडू कुटे, जिल्हा सचिव संदेश देशमुख, उमेदवार ओमप्रकाश कोटकर, विशाल गोटरे, कय्युमखाँ पठाण, कडुजी पाटील, कल्याण देशमुख, विकास शिंदे, बद्री कोटकर, आनंद सारडा, संतोष बांगर, प्रकाश कऱ्हाळे, राजू नागरे उपस्थित होते. यावेळी बंडू कुटे व संदेश देशमुख यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली. (जि.प्र.)