शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

१४५ कोटींचे पीक कर्ज वाटप होईना !

By admin | Updated: September 17, 2014 01:12 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील बँकांना खरीप पीक कर्ज वाटपासाठी ४८२ कोटींचे उद्दिष्ट दिलेले असताना बँकांनी आजवर ३३७ कोटी ८१ लाख रुपयांचे वाटप केले आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यातील बँकांना खरीप पीक कर्ज वाटपासाठी ४८२ कोटींचे उद्दिष्ट दिलेले असताना बँकांनी आजवर ३३७ कोटी ८१ लाख रुपयांचे वाटप केले आहे. आजही १४५ कोटी रूपयांचे वाटप करणे बाकी असल्याचे लोकमतने उघडकीस केल्या नंतर पीक कर्ज वाटपास टाळाटाळ करणाऱ्या बँकाविरुध्द आता कडक कारवाईचे पाऊल प्रशासनाने उचले असून बँका शेतकऱ्यांना पिककर्ज उपलब्ध करुन देत नसल्याने प्रशासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत बँकाना कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.ऐन पेरणीच्या काळात पावसाने ओढ दिली. तरीही शेतकऱ्यांनी न डगमगता पेरणी उरकली. अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्जाच्या भरवश्यावर उसणवारी करून गरज भागविली. परंतु, अर्ज दाखल करूनही कर्ज मिळत नाही, अशी ओरड मागील काही दिवसांपासून होत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीही दाखल झाल्या आहेत. बळीराजा या गैरसोयीला तोंड देत असतानाच काही राष्ट्रीयकृत बँकांनी खाजगी नियमापेक्षा जास्त व्याज आकारल्याचेही समोर आले होते. या दुहेरी संकटामुळे बळीराजा अक्षरश: हवालदिल झाला आहे. खरीप हंग़ामात पीककर्ज वाटपाची टक्केवारी अनेक बँकाची निराशाजनक आहे. वारंवार पाठपुरावा करुनही बँका दखल घेत नसल्याने लागोपाठच्या दोन वर्षाची दुष्काळ परिस्थिती आणि त्यानंतरच्या गारपीटीने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे जिल्ह्याचञया दृष्टीने ही आपत्तीची परिस्थिती आहे. या परिस्थितीत बँका शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करुन देत नसल्याने जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापना कायद्यांतर्गत कारवाईचा इशारा बैठकीत देण्यात आला आहे.ऐनवेळी पैसा उभा करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना खाजगी सावकाराचे उंबरठेही झिजवावे लागले. वास्तविक पैशाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबू नयेत, या उद्देशाने शासनाने जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामासाठी ४८२ कोटी ९४ लाख रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. बँकांकडून यापैकी केवळ ३३७ कोटी ८१ लाख रुपयांचे पिक कर्ज वाटप करण्यात आले असून जवळपास १४१ कोटी रुपयांचे पीक कर्ज अद्यापही वाटप झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अशा बँकांवर आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.