गटार योजनेसाठी केंद्र शासनाने दिला १४४ कोटींचा निधी

By Admin | Updated: August 20, 2014 00:56 IST2014-08-20T00:41:07+5:302014-08-20T00:56:16+5:30

औरंगाबाद : शहरातील ड्रेनेज सिस्टीम अपडेट करण्यासाठी २०४५ सालापर्यंतच्या नियोजनासाठी ३६६ कोटी रुपयांची ‘सिव्हेज डेव्हलपमेंट अपग्रेडेशन’ योजना नगरोत्थान अंतर्गत मनपाने तयार केली आहे़

144 crore fund for the drainage scheme | गटार योजनेसाठी केंद्र शासनाने दिला १४४ कोटींचा निधी

गटार योजनेसाठी केंद्र शासनाने दिला १४४ कोटींचा निधी

औरंगाबाद : शहरातील ड्रेनेज सिस्टीम अपडेट करण्यासाठी २०४५ सालापर्यंतच्या नियोजनासाठी ३६६ कोटी रुपयांची ‘सिव्हेज डेव्हलपमेंट अपग्रेडेशन’ योजना नगरोत्थान अंतर्गत मनपाने तयार केली आहे़ ४६४ कोटीतून त्या योजनेचे काम होणार असून, योजनेचा कालावधी तीन वर्षांचा आहे. शासन ८० टक्के अनुदान देणार आहे़ राज्यशासन व पालिकेला १० टक्के रक्कम उभारावी लागणार आहे़ फोरट्रेस ही संस्था ड्रेनेज सिस्टीमवर काम करीत आहे. १४४ कोटी रुपयांचा निधी संयुक्त पुरोगामी आघाडी शासनाने जानेवारी २०१४ मध्ये मनपाला दिला आहे.
१५२ कोटींचे एसटीपी
१९७५ पासून आजवरच्या एसटीपींपैकी फक्त सिडकोचा प्लांट सुरू आहे़ सलीम अली सरोवरामधील प्लांट सुरू असून झाल्टा, बनेवाडी येथील प्लांट बंद आहेत़ त्या दोन्ही एसटीपीसहयोजनेमध्ये १५२ कोटी ८७ लाख रुपयांचे ७ एसटीपी प्रस्तावित आहेत़ त्यापैकी ६ एसटीपी होतील. १८४ एमएलडी पाणी ६ प्लांटमधून शुद्ध करण्याचा दावा पालिका करीत आहे. ७ नाल्यांपैकी ४ नाले कांचनवाडीच्या दिशेने जातात़ तेथे मोठा एसटीपी असेल़
तेथील १०० एमएलडी पाणी एमआयडीसीला ५ रुपये किलो लिटरने विकण्याचा दावा आहे.मनपाच्या ५० एकरपैकी १० एकर जागेवर तो प्लांट असेल़ उद्यानाजवळील प्लांटचे पाणी बसस्थानक व उद्यानाला देण्याचा मनपाचा विचार आहे़ मजनू हिल एसटीपीतील शुद्ध केलेले पाणी सलीम अली सरोवरामध्ये सोडण्यात येईल़
२०९ कोटींच्या ड्रेनेज वाहिन्या़़़
२०९ कोटी ७५ लाख रुपयांतून लॅटलर्स, ब्रँचेस, मेन सिव्हर, १५० डायमीटरच्या ३४० कि़ मी़ ड्रेनेज वाहिन्यांची योजनेत तरतूद आहे़ २७१ कि़ मी़ नवीन वाहिन्या टाकण्यात येणार आहेत़ जुन्या लाईन तशाच ठेवण्यात येतील़ विद्यमान मेन सिव्हर लाईन्स ७१ कि़ मी़ असून, त्या पूर्णत: फुटल्या आहेत़ त्यामुळे नाल्यातून मलमिश्रित पाणी वाहते़ खाम व सुखना नदीपात्रातून २४० एमएलडी पाणी गोदावरीच्या दिशेने जाईल़ तेथून ६० एमएलडी पाणी वाहणार आहे़ २०४५ पर्यंत शहराची संकल्पित लोकसंख्या ३०० एमएलडी मलमिश्रित जलउत्सर्जित करेल़ ते पाणी एसटीपीमध्ये शुद्ध करण्यात येईल, असा मनपाचा दावा आहे.

Web Title: 144 crore fund for the drainage scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.