१४४ अर्जांची जिल्ह्यात झाली विक्री
By Admin | Updated: September 20, 2014 23:39 IST2014-09-20T23:28:23+5:302014-09-20T23:39:53+5:30
परभणी: विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना प्रकाशित झाली असून, अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात १४४ अर्जांची विक्री झाली़

१४४ अर्जांची जिल्ह्यात झाली विक्री
परभणी: विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना प्रकाशित झाली असून, अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात १४४ अर्जांची विक्री झाली़ गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आ़ सीताराम घनदाट यांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला़
परभणी विधानसभा मतदार संघामध्ये ३६ जणांनी ८७ अर्ज खरेदी केले़ त्यात बारा जणांनी पक्षाच्या नावावर तर अपक्ष म्हणून २४ जणांनी अर्ज खरेदी केले आहेत़ बसपा, मजलीस बचाओ तहेरीक, वंचित समाज इन्साफ पार्टी, शिवसेना, काँग्रेस, भारिप- बहुजन महासंघ, राष्ट्रवादी काँग्रेस, एम़आय़एम़, रिपाइं (ए) आदी पक्षांच्या वतीने अर्ज खरेदी झाली आहे़ आज दिवसभरात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याचे निवडणूक विभागातून सांगण्यात आले़
घनदाट यांचा उमेदवारी अर्ज
गंगाखेड विधानसभा मतदार संघात ३३ उमेदवारी अर्ज विक्री झाले़ पहिल्याच दिवशी विद्यमान आ़ सीताराम घनदाट यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी एस़एच़ मावची यांच्याकडे दाखल केला़ यावेळी आ़ सीताराम घनदाट यांच्यासोबत सदाशिवअप्पा ढेले, गणेशराव काळे, भास्कर काळे, दत्तराव भोसले, जयसिंगअप्पा शिंदे, मधुकर चाटे, कैलास रुद्रवार, लाल खान पठाण, मधुसूदन लटपटे, गौतम रोहिणकर आदींची उपस्थिती होती़
जिंतुरातून २४ नामांकनाची विक्री
जिंतूर : सेलू विधानसभा मतदार संघातून २४ नामांकनांची चौदा जणांनी खरेदी केल़ी. यात मनसेचे खंडेराव आघाव, राकाँचे विजय भांबळे, सेनेचे संजय साडेगावकर, भाजपाचे विलास गिते, बसपाचे राहुल आमटे, सपाचे सय्यद दिलावर, शरिफ खान पठाण यांनी नामांकन खरेदी केले असून, यांच्या व्यतिरिक्त सात अपक्ष उमेदवारांनी नामांकन पत्र खरेदी केले आहेत़ उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी आज एकही नामांकन प्राप्त झाले नाही़
पाथरीत एकही अर्ज नाही
पाथरी विधानसभा मतदारसंघात २० सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज देणे-घेण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाने सुरू केली. परंतु, आज पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अर्ज विक्री झाला नाही. (प्रतिनिधी)