शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोड कृषी उत्पन्न बाजारसमिती निवडणुकीत १८ जागेसाठी १४३ उमेदवारी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 19:28 IST

उमेदवारी मागे घेण्याची शेवटी तारीख १६ जानेवारी आहे.

सिल्लोड: कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १८ जागेसाठी शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण १४३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या उमेदवारी अर्जाची छाननी १ जानेवारीला होणार आहे.

सहकारी संस्था सर्वसाधारण ७ जागेसाठी ४८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे.त्याच प्रमाणे सहकारी संस्था इतरमागावर्ग १ जागेसाठी ६ अर्ज आले आहे.सहकारी संस्था वि. जा.भ.ज. १ जागेसाठी ८ उमेदवारी अर्ज आले आहे.सहकारी संस्था महिला मतदार संघातून २ जागेसाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातून २ जागेसाठी २५ उमेदवारी अर्ज आले आहे.ग्रा.प.अ.जा.अ. ज.:-एक जागेसाठी ११ अर्ज आले आहे.ग्रा.प.दुर्बल घटक मधून एक जागेसाठी ८ अर्ज आले आहे.व्यापारी मतदार संघातून दोन जागेसाठी १८ अर्ज आले आहे.हंमाल मापाडी मतदार संघातून एका जागेसाठी ६ अर्ज आले आहे.असे एकूण १८ जागेसाठी १४३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्वाचन अधिकारी ज्ञानेश्वर मातेरे यांनी दिली. दरम्यान, उमेदवारी मागे घेण्याची शेवटी तारीख १६ जानेवारी आहे. चिन्ह वाटप १७ जानेवारी रोजी तर मतदान २८ तारखेला होणार आहे.

या निवडणुकीत बाजार समितीचे माजी विद्यमान सभापती अर्जुन पाटील गाढे, माजी उपसभापती नंदकिशोर सहारे,  माजी संचालक सतीश ताठे, कारखान्याचे माजी चेअरमन श्रीरंग साळवे, अरुण पाटील शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, प्रभाकर काळे, पंजाब चव्हाण, बाजार समितीचे माजी उपसभापती ठगण भागवत पाटील, शांतीलाल अग्रवाल, अंकुश पाटील, विश्वाला दाभाडे, वैभव तायडे,राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष देविदास आमटे,माजी सरपंच चंद्रशेखर साळवे,शिवसेना उद्धव गटाचे सुदर्शन अग्रवाल,भाजपचे दिलीप दानेकर,भाजपचे माजी नगर परिषद उपाध्यक्ष किरण पवार,अजिंठ्याचे मेघराज चोंडिये,माजी नगराध्यक्ष बनेखा पठाण,भावराव लोखंडे या मातब्बर नेत्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmarket yardमार्केट यार्ड