शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

ठाण मांडलेले १४२ पोलीस बदलीच्या ठिकाणी रूजू

By admin | Updated: November 26, 2014 01:08 IST

जालना : पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी बदली केल्यानंतरही ठाणे प्रमुखांच्या आशिर्वादामुळे ठाण मांडून बसलेले तब्बल १४३ पोलिस कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी पाठविण्यात आले.

जालना : पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी बदली केल्यानंतरही ठाणे प्रमुखांच्या आशिर्वादामुळे ठाण मांडून बसलेले तब्बल १४३ पोलिस कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी पाठविण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यात ही परिस्थिती होती. परिक्षेत्र पोलिस महासंचालक अमितेषकुमार यांच्या दणक्यामुळेच हा चमत्कार घडला. सिंह यांनी जिल्ह्याच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या होत्या. जवळपास पोलिस ठाण्यांमध्ये काही कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून वरिष्ठांची दिशाभूल करून बदली टाळत होते. पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेली मजबूत पकड करून आरोपींशी संधान साधणारे काही पोलिस कर्मचारी गरज नसतांनाही अधिकाऱ्यांशी संधान साधून टिकून होते. सदर बाजार, कदीम जालना, तालुका जालना, वाहतूक शाखा या ठिकाणी अनेक कर्मचारी तळ ठोकून होते. एक वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, जिल्ह्यात झालेल्या बदल्यांना मूळमाती देण्यासाठी सुरू असलेल्या प्रकाराला खिळ बसली आहे. आता बहुतांश पोलिस ठाण्यांमध्ये भविष्यात चांगले काम होऊ शकेल. (प्रतिनिधी)४अमितेषकुमार यांनी पोलिस मुख्यालयासह पोलिस वसाहतीमध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. पोलिस कर्मचाऱ्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या. त्यावर तोडगा काढण्यासाठी आदेशही दिले आहेत. वसाहतीमध्ये नागरी सुविधांसाठी उपाय योजनाही सुचविण्यात आल्या आहेत. पोलिस वसाहत व मुख्यालयाच्या परिसरात असलेल्या परसबागेची पाहणी करून समाधान व्यक्त केले. ४जिल्ह्यातील सर्वच ठाण्यांचे प्रमुख व विभाग प्रमख यांची बैठक घेऊन अमितेषकुमार वर्षभरात दाखल गुन्ह्यांचा आढावा घेतला. तपास कामाची गती वाढविण्याचे ठाणे प्रमुखांना आदेश दिले आहेत. पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी वारंवार सूचना करून ठाण्यांच्या कारभारात केलेल्या सुधारणांची दखल घेतली. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव केला.