१४०० उमेदवारांनी दिली परीक्षा
By Admin | Updated: April 9, 2017 23:19 IST2017-04-09T23:17:53+5:302017-04-09T23:19:10+5:30
बीड : जिल्हा पोलीस दलातर्फे सुरु असलेल्या भरती प्रक्रियेत रविवारी १४०० उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली.

१४०० उमेदवारांनी दिली परीक्षा
बीड : जिल्हा पोलीस दलातर्फे सुरु असलेल्या भरती प्रक्रियेत रविवारी १४०० उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. परीक्षा सुरळीत पार पडल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.
जिल्हा पोलीस दलात शिपाई पदाच्या ६९ जागांसाठी आॅनलाईन अर्ज मागविले होते. सुमारे ९ हजारावर उमेदवारांनी भरतीसाठी नोंदणी केली होती. उमेदवारांची मैदानी चाचणी पोलीस मुख्यालयावर टप्प्याटप्प्याने पार पडली. भरती प्रक्रियेत पारदर्शकता रहावी यासाठी पहिल्यांदाच बायोमेट्रिक प्रणालीचा अवलंब केला होता. रविवारी सकाळी ११ ते १२:३० या दरम्यान १०० गुणांची लेखी परीक्षा आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयात झाली. लेखी परीक्षेकरिता १५१८ उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी १४०० उमेदवार परीक्षेला हजर होते. उमेदवारांची तपासणी करुन त्यांना केंद्रात प्रवेश देण्यात आला. यावेळी बंदोबस्त तैनात होता. परीक्षा सुरळी व्हावी यासाठी अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक गणेश गावडे यांच्यासह कर्मचारी तळ ठोकून होते. (प्रतिनिधी)