शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गोडाऊनला लागलेल्या आगीत १४ वर्षीय बालकाचा गुदमरून मृत्यू; संपूर्ण कुटुंब अत्यवस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 11:59 IST

तिघेजण अत्यवस्थ असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत

औरंगाबाद : शहरातील उल्कानगरी परिसरातील खिंवसरा पार्क येथे एका घरात असलेल्या इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या गोडाऊनला लागलेल्या आगीत १४ वर्षीय बालकाचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. संस्कार शामसुंदर जाधव असे मृताचे नाव आहे. या आगीतील धुरामुळे शामसुंदर जाधव त्यांच्या पत्नी सविता व मुलगी संकृती या अत्यवस्थ असून त्यांच्यावर हेडगेवार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, खिंवसर पार्क येथील पाठक यांच्या घरात शामसुंदर जाधव हे भाड्याने राहतात. त्यांच्या इलेक्ट्रॉनिक साहित्याचा व्यवसाय आहे. याच घराच्या खालच्या मजल्यावर त्यांनी इलेक्ट्रोनिक साहित्याचे गोडाऊन केले आहे. बुधवारी रात्री या गोडाऊन मध्ये त्यांनी माल उतरवला होता. बुधवारी पहाटे अचानक या गोडाऊनला आग लागली आणि धुराचे लोट त्यातून बाहेर पडले. हा धूर वरच्या मजल्यावर राहत असलेल्या जाधव यांच्या घरात पोहंचला. काही क्षणात संपूर्ण घरात मोठ्याप्रमाणावर धूर झाल्याने जाधव कुटुंबास बाहेर पडण्यास संधी मिळाली नाही. पहाते गोडाऊनला आग लागल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस व अग्निशमन दलास माहिती दिली. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरु केले.

खालच्या मजल्यावरील गोडाऊनमधील आग विझवून अग्निशमन दलाने घरात प्रवेश केला. यावेळी घरामध्ये १४ वर्षीय संस्कार जाधव याचा गुदमरून मृत्यू झाल्याचे तर जाधव यांचे संपूर्ण कुटुंब अत्यवस्थ असल्याचे आढळून आले. यानंतर पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी शामसुंदर जाधव त्यांच्या पत्नी सविता व मुलगी संकृती यांना हेडगेवार रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

टॅग्स :fireआगAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू