बसमधून १४ तोळे सोने लंपास
By Admin | Updated: December 14, 2015 23:58 IST2015-12-14T23:53:02+5:302015-12-14T23:58:12+5:30
औरंगाबाद : पुणे-औरंगाबाद एसटी बसचा प्रवास एका प्रवाशाला चांगलाच महागात पडला. औरंगाबादच्या एका प्रवाशाचे बॅगमध्ये ठेवलेले १४ तोळे सोने लंपास झाल्यामुळे

बसमधून १४ तोळे सोने लंपास
औरंगाबाद : पुणे-औरंगाबाद एसटी बसचा प्रवास एका प्रवाशाला चांगलाच महागात पडला. औरंगाबादच्या एका प्रवाशाचे बॅगमध्ये ठेवलेले १४ तोळे सोने लंपास झाल्यामुळे तब्बल तीन लाख ५५ हजारांना चुना लागला आहे. या प्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनायक दत्तात्रय कुलकर्णी (६२, रा. सारंग सोसायटी, गारखेडा) हे १२ डिसेंबर रोजी पुण्यातून एशियाड सेमी लक्झरी बसमध्ये औरंगाबादला येण्यासाठी बसले. ते चालक मिसाळ यांच्या शेजारच्या सीटवर बसून प्रवास करीत होते. त्यांची बस दुपारी १.३० वाजता सुपा (जि. अहमदनगर) येथून जवळ असलेल्या एका हॉटेलसमोर थांबली. यावेळी कुलकर्णी यांची बॅग बसमध्येच होती; परंतु ते खाली उतरले होते. अर्ध्या तासाने त्यांची बस हॉटेलपासून निघाली. ती औरंगाबाद येथे मध्यवर्ती बसस्थानकात सायंकाळी ५ वाजता पोहोचली. यावेळी त्यांनी बॅग पाहिली असता त्यांना १४ तोळे सोने आढळले नाही.