मनोहर धोंडेंसह १४ जण निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:23 IST2017-08-27T00:23:27+5:302017-08-27T00:23:27+5:30

व्यापाºयाला मारहाण प्रकरणात शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा़ मनोहर धोंडेंसह १४ जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे़

 14 people innocent, with Manohar Dhonden | मनोहर धोंडेंसह १४ जण निर्दोष

मनोहर धोंडेंसह १४ जण निर्दोष

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: व्यापाºयाला मारहाण प्रकरणात शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा़ मनोहर धोंडेंसह १४ जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे़
आनंदनगर येथील बालकिशन तोष्णीवाल यांनी ४ नोव्हेंबर २०११ मध्ये विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती़ त्यानुसार, प्रा़ धोंडे आणि इतर १४ जणांनी त्यांच्या दुकानात येऊन पत्नीसमक्ष मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली होती़ त्यामध्ये गैरकायदेशीर मंडळी जमा करणे, दहशत निर्माण करणे, मारहाण करणे आदी आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते़ अतिरिक्त मुख्य न्या़रा़स़ देशपांडे यांच्यासमोर सरकार पक्षाने चार साक्षीदार तपासले़ तर प्रा़धोंडे व इतर १४ जणांच्या वतीने अ‍ॅड़शिवराज पाटील यांनी चारही साक्षीदारांच्या साक्षीतील तफावत युक्तिवादाद्वारे निदर्शनास आणून दिली़ त्यामुळे सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने प्रा़ धोंडे यांच्यासह १४ जणांची निर्दोष मुक्तता केली़

Web Title:  14 people innocent, with Manohar Dhonden