परळीत १४ लाखांचा गुटखा जप्त
By Admin | Updated: January 26, 2017 00:04 IST2017-01-26T00:03:48+5:302017-01-26T00:04:47+5:30
परळी : शहरातील जर्दा विक्रेत्याच्या घरालगत असलेल्या गोदामातून १४ लाख रूपयाचा गुटखा अन्न प्रशासन अधिकारी व पोलिसांनी संयुक्त कारवाईत बुधवारी जप्त केला.

परळीत १४ लाखांचा गुटखा जप्त
परळी : शहरातील जर्दा विक्रेत्याच्या घरालगत असलेल्या गोदामातून १४ लाख रूपयाचा गुटखा अन्न प्रशासन अधिकारी व पोलिसांनी संयुक्त कारवाईत बुधवारी जप्त केला. रिक्षामधून आलेला हा गुटखा गोदामात उतरवत असतानाच ही कारवाई झाली.
अंबाजोगाई विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना या संदर्भात माहिती मिळाली होती. त्यांनी अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षा जाधवर, शहर ठाण्याचे निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांना कळविले. त्यानुसार उपनिरीक्षक रमेश जाधवर यांनी पथकातील कर्मचाऱ्यांसोबत जर्दा विके्रता गौरव अशोक जाजू याच्या घरावर धाड टाकण्यात आली. घरातलगत असलेल्या गोदामात मोठ्या प्रमाणावर गुटखा आढळून आला. दुपारी बारा वाजता सर्व गुटख्यांचे पोते शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सुगंधी सुपारी, सुगंधी तंबाखू, गुटखा व विविध प्रकारचा पान मसाला यावेळी जप्त करण्यात आला. पाच तास सर्व तपासणी झाली. तब्बल १४ लाख १४ हजार ३०० रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून, सायंकाळी तो ठाण्याच्या मागील आवारात जाळून नष्ट करण्यात आला.
पथकात पीएसआय एम.एल.शेख, पोलीस नाईक साजेद पठाण, उमेश अघाव, श्रीकांत चौधरी, अमर घुगे, संजय ठाकरे, गौस फकीर, दिलीप गीत्ते यांचा सहभाग होता.
अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधवर यांनी सदरील गुटखा व सुपारीची तपासणी केली. या प्रकरणी गौरव अशोक जाजू याच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)