13727 मतदार जिल्ह्यात वाढले
By Admin | Updated: July 3, 2014 00:24 IST2014-07-02T23:57:37+5:302014-07-03T00:24:19+5:30
हिंगोली : निवडणूक विभागाच्या वतीने जिल्ह्यात २१ ते २९ जून या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणी मोहीमेत जिल्ह्यात १३ हजार ७२७ नवीन मतदारांची नोंद झाली आहे.

13727 मतदार जिल्ह्यात वाढले
हिंगोली : निवडणूक विभागाच्या वतीने जिल्ह्यात २१ ते २९ जून या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणी मोहीमेत जिल्ह्यात १३ हजार ७२७ नवीन मतदारांची नोंद झाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक विभागाच्या वतीने छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ९ जूनपासून सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत ९ जून रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर या यादीवर ३० जूनपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात आल्या. याच दरम्यान २१ ते २९ जून या कालावधीत विशेष मतदार नोंदणी मोहीम जिल्ह्यात राबविण्यात आली.
त्यानुसार वसमत विधानसभा मतदारसंघात ३ हजार ७४१, कळमनुरी विधानसभा मतदार संघात ३ हजार ७०७ आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघात ५ हजार ५७९ असे एकूण १३ हजार ७२७ मतदार वाढले. त्यानुसार आता वसमत विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ६२ हजार २५७ मतदान झाले असून, कळमनुरी विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ८० हजार ७६७ मतदारांची संख्या झाली आहे.
हिंगोली विधानसभा मतदारसंघात २ लाख ८४ हजार ९९६ मतदारांची संख्या झाली आहे. जिल्ह्यात ३ विधानसभा मतदारसंघात आता एकूण ८ लाख २८ हजार २० मतदारांची नोंद झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करेपर्यंत नवीन मतदारांची नोंदणी चालूच राहणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्ह्यात आता ८ लाख २८ हजार मतदार
२१ ते २९ जून या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणी मोहीमेत वसमत तालुक्यात ३ हजार ७४१, कळमनुरी तालुक्यात ४ हजार ४०७ तर हिंगोली तालुक्यात ५ हजार ५७९ मतदार वाढले.
हिंगोली विधानसभा मतदारसंघात आता सर्वाधिक म्हणजे २ लाख ८४ हजार ९९६ मतदार.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघात आता एकूण २ लाख ८० हजार ७६७ मतदारांची नोंद.
वसमत विधानसभा मतदारसंघात आता एकूण २ लाख ६२ हजार २५७ मतदारांची नोंद.
नवमतदार नोंदणी चालूच राहणार.