बायपाससाठी १३.५० कोटी

By Admin | Updated: April 21, 2015 00:54 IST2015-04-21T00:44:52+5:302015-04-21T00:54:15+5:30

रऊफ शेख , फुलंब्री औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर फुलंब्री येथे वळण रस्त्यासाठी राज्य शासनाने साडेतेरा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. येत्या महिनाभरात जमीन संपादन करण्याचे काम सुरू

13.50 crores for bypass | बायपाससाठी १३.५० कोटी

बायपाससाठी १३.५० कोटी


रऊफ शेख , फुलंब्री
औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर फुलंब्री येथे वळण रस्त्यासाठी राज्य शासनाने साडेतेरा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. येत्या महिनाभरात जमीन संपादन करण्याचे काम सुरू करून चौपदरीकरणासोबत काम पूर्ण होणार आहे.
औरंगाबाद-जळगाव राज्य रस्ता क्रमांक आठचे चौपदरीकरण व फुलंब्री येथील वळण रस्त्याला मंजुरी मिळून चार वर्षे झाली; पण पुढील प्रकियेला उशीर झाला. आता फुलंब्री येथील वळण रस्त्यासाठी राज्य सरकारने साडेतेरा कोटी रुपये मंजूर केले. हा निधी जमीन संपादनासाठी वापरला जाईल. औरंगाबाद रस्त्यावरील गट क्रमांक १०२ पासून ३२० पर्यंत सुमारे साडेपाच कि़ मी. लांब व तीस मीटर रुंद हा रस्ता होणार आहे.
रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर साडेतीन कोटी रुपयेच मंजूर झाले होते. ते वाढवून आता साडेतेरा कोटी झाले आहेत. जमीन संपादन करण्यास जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता मिळाली आहे. येत्या महिनाभरात प्रक्रिया सुरू होणार आहे. जमीन संपादन झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येईल. भूमी अभिलेख विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन झाल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊ शकते. जागतिक बँक प्रकल्पांतर्गत औरंगाबाद-जळगाव रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासोबत फुलंब्रीत वळण रस्ताही होणार असून चौपदरीकरणाच्या कामासोबतच हे काम हाती घेतले जाणार आहे.
फुलंब्री येथील औरंगाबाद-जळगाव राज्य रस्त्यावरील वळण रस्त्याच्या कामासाठी शासनाने साडेतेरा कोटी रुपयांची तरतूद केली असून या कामाची लवकरच सुरुवात होईल, असे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग के. आर. गाडेकर यांनी सांगितले.

Web Title: 13.50 crores for bypass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.