विभागातील अतिवृष्टीग्रस्तांना १,३०३ कोटींची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:11 IST2021-01-08T04:11:23+5:302021-01-08T04:11:23+5:30
औरंगाबाद : गेल्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७ जानेवारी रोजी मदतीच्या दुसऱ्या ...

विभागातील अतिवृष्टीग्रस्तांना १,३०३ कोटींची मदत
औरंगाबाद : गेल्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७ जानेवारी रोजी मदतीच्या दुसऱ्या हप्त्यापोटी शासनाने १,३०३ कोटी ४९ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. दोन दिवसांत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचा दावा विभागीय प्रशासनाने केला. २१ आणि २२ डिसेंबर रोजी केंद्रीय पथकाने पाहणी केल्यानंतर ही मदत जाहीर झाली आहे. अतिवृष्टीमुळे विभागातील ३६ लाख शेतकऱ्यांचे २६ लाख हेक्टरातील पिकांचे नुकसान झाले होते. जिरायती, कोरडवाहूसाठी हेक्टरी १० हजार आणि फळबागांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची घोषणा शासनाने केली होती. मराठवाड्याला १,३२८ कोटींचा पहिला हप्ता देण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्यात १,३०३ कोटी ४९ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. हा निधी जिल्हानिहाय वितरित करण्यात आला आहे.
जिल्हानिहाय प्राप्त अनुदान
औरंगाबाद- १४१ कोटी ९२ लाख, जालना- २६१ कोटी १३ लाख, परभणी- ९० कोटी २० लाख, हिंगोली- ११४ कोटी ९८ लाख, नांदेड- २८२ कोटी ५६ लाख, बीड- १५३ कोटी ३७ लाख, लातूर- १२५ कोटी १५ लाख, उस्मानाबाद- १३३ कोटी ६५ लाख रुपये.