१३० तीव्र तर ७६४ मध्यम कुपोषित बालके

By Admin | Updated: June 20, 2014 00:12 IST2014-06-20T00:12:35+5:302014-06-20T00:12:35+5:30

देगलूर : तालुका एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पासमोर आव्हान उभे ठाकले असून १३० तीव्र तर ७६४ मध्यम कुपोषित बालके आढळून आली आहेत़

130 acute and 764 middle child malnourished | १३० तीव्र तर ७६४ मध्यम कुपोषित बालके

१३० तीव्र तर ७६४ मध्यम कुपोषित बालके

देगलूर : कुपोषण मुक्तीसाठी राबविल्या जाणाऱ्या राजमाता जिजाऊ आरोग्य पोषण योजनेला मिळणारा अपुरा निधी, अंगणवाडी कार्यकर्तींचा संप आदी विविध कारणांमुळे देगलूर तालुका एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पासमोर कुपोषित बालकांचे आव्हान उभे ठाकले असून तालुक्यात १३० तीव्र तर ७६४ मध्यम कुपोषित बालके आढळून आली आहेत़
राज्यातील बालकांचे कुपोषण एकात्मिक पद्धतीने दूर करण्यासाठी शासनाने काही वर्षांपासून एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सुरू केला आहे़ राज्यात चालणाऱ्या गाव, तांडा, वाड्या पातळीवर चालणाऱ्या अंगणवाड्यांच्या मदतीने कुपोषणमुक्तीचा कार्यक्रम चालविला जातो़ हा प्रकल्प चालविण्यासाठी काही बचत गटांची आणि ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठासारख्या काही योजनांची मदत होते़ देगलूर तालुक्यात एकूण ११६ गावे आहेत़ तालुक्याच्या ठिकाणचे उपजिल्हा रुग्णालय वगळता हणेगाव, मरखेल, शहापूर या तीन गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत़ तालुक्यात हणेगाव, बेंबरा, माळेगाव, मरखेल, बल्लूर, खानापूर, शहापूर, तमलूर हे आठ सर्कल आहेत़ या सर्व सर्कलमध्ये २०५ मोठ्या व ४३ मिनी अंगणवाड्या कार्यरत आहेत़ ८०० लोकसंख्या असेल तर मोठी अंगणवाडी आणि ३०० ते ३५० लोकसंख्येसाठी मिनी अंगणवाडी चालविली जाते़
देगलूर तालुका एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाच्या वतीने मे २०१४ मध्ये तालुक्यातील १७ हजार ८०० बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली़ या तपासणी अभियानात तालुक्यात १३० तीव्र कुपोषित तर ७६४ मध्यम कुपोषित बालके आढळून आली़
सर्कलनिहाय आरोग्य तपासणी करण्यात आलेल्या बालकांची व कुपोषित बालकांची संख्या पुढील प्रमाणे- हणेगाव २५१८-१० तीव्र कुपोषित, ८४ मध्यम कुपोषित, बेंबरा १९४२- ४ तीव्र कुपोषित, ८० मध्यम कुपोषित, माळेगाव-१९०२- ३ तीव्र कुपोषित, ४३ मध्यम कुपोषित, मरखेल-२१२८- ४ तीव्र कुपोषित, १०० मध्यम कुपोषित, खानापूर-२२४८- १७ तीव्र, १२३ मध्यम कुपोषित, बल्लूर-२१८८-१८ तीव्र, ६३ मध्यम कुपोषित, शहापूर-२६८९- १३ तीव्र, ६६ मध्यम कुपोषित, तमलूर-२८२९- ३८ तीव्र कुपोषित व १४१ मध्यम कुपोषित आहेत.काही केंद्रांना बचत गटाकडून पुरविल्या जाणाऱ्या अपुऱ्या सुविधा, ग्रामपंचायतीकडून मिळणारा अल्प निधी, जानेवारी महिन्यात वेतनवाढीसाठी अंगणवाडी कार्यकर्ती आणि सेविकांनी केलेला संप, तीव्र उन्हाळा, स्थलांतर यामुळे कुपोषित बालकांचे प्रमाण थोडेसे वाढले असून ते कमी करण्यासाठी तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे वजन वाढण्यासाठी एकात्मिक प्रकलपाच्या माध्यमातून टोनेक्स नावाचे शक्तीवर्धक औषध पाजविण्यात आल्याचे व युद्धपातळीवर प्रमाण कमी करण्यात येईल असे आश्वासन प्रकल्प विस्तार अधिकारी श्रीमती ए़ एम़ हलगे यांनी लोकमतला सांगितले़ (वार्ताहर)

Web Title: 130 acute and 764 middle child malnourished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.