१३ वर्षीय बालिकेवर १५ वर्षांच्या मुलाचे अत्याचार; पीडितेची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 19:05 IST2018-06-16T19:04:58+5:302018-06-16T19:05:44+5:30

मावशीच्या घरी आलेल्या १३ वर्षीय बालिका परिसरात एकटीच खेळत असल्याचे पाहून तिला शंभर रुपये देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर १५ वर्षीय मुलाने (विधीसंघर्षग्रस्त बालक) बलात्कार केल्याचे समोर आले.

13-year-old girl rapes her 15-year-old child; Disrupted hospital health | १३ वर्षीय बालिकेवर १५ वर्षांच्या मुलाचे अत्याचार; पीडितेची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल

१३ वर्षीय बालिकेवर १५ वर्षांच्या मुलाचे अत्याचार; पीडितेची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल

औरंगाबाद : मावशीच्या घरी आलेल्या १३ वर्षीय बालिका परिसरात एकटीच खेळत असल्याचे पाहून तिला शंभर रुपये देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर १५ वर्षीय मुलाने (विधीसंघर्षग्रस्त बालक) बलात्कार केल्याचे समोर आले. ही घटना ८ जून रोजी बायजीपुरा परिसरातील अल्तमश कॉलनीत घडली. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. 
 

८ जून रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पीडितेची मावशी कामानिमित्त घराबाहेर गेली होती. त्यावेळी पीडिता घरात एकटीच होती. यावेळी ती घराला बाहेरून कडी लावून परिसरातील मनपा शाळेकडे खेळण्यासाठी गेली. तेथे पंधरा वर्षीय अनोळखी मुलगा तिला भेटला. यावेळी त्याने तिला शंभर रुपये देण्याचे आमिष दाखविले आणि तो तिला तेथून कोठेतरी घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. नंतर त्याने तिला पुन्हा शाळा परिसरात आणून सोडले. ही बाब कोणालाही सांगू नको, असे धमकावून तो तेथून निघून गेला. तिनेही मावशीला याबाबत माहिती दिली नाही.

दुसऱ्या दिवशी तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिचे नातेवाईक तिला खाजगी रुग्णालयात घेऊन गेले. तेथे त्यांनी तिला थंडीतापाच्या गोळ्या दिल्या. त्यानंतरही मुलीची  प्रकृती अधिक खालावल्याने नातेवाईक तिला घाटी रुग्णालयात घेऊन गेले. तेथील डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

चेहऱ्यावरून ओळखला संशयित
पीडितेला आरोपीचे नाव माहीत नव्हते. मात्र चेहऱ्यावरून तिने त्याला ओळखले. पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेतले असून तो दहावीत शिकत आहे. त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

Web Title: 13-year-old girl rapes her 15-year-old child; Disrupted hospital health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.