मनपाच्या एका जागेसाठी ११ जणांचे १३ अर्ज

By Admin | Updated: March 30, 2016 00:45 IST2016-03-30T00:29:32+5:302016-03-30T00:45:46+5:30

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या प्रभाग ११ ब च्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ११ उमेदवारांचे १३ अर्ज आले आहेत़ भाजपा

13 nominations for 11 candidates for one place in the Municipal Corporation | मनपाच्या एका जागेसाठी ११ जणांचे १३ अर्ज

मनपाच्या एका जागेसाठी ११ जणांचे १३ अर्ज


लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या प्रभाग ११ ब च्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ११ उमेदवारांचे १३ अर्ज आले आहेत़ भाजपा, शिवसेनेने प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत़ तर राष्ट्रवादी काँग्रेसने एकच अर्ज दाखल केला आहे़ प्रारंभी राष्ट्रवादी, शिवसेना व शेवटच्या अर्ध्या तासात भाजपाच्या उमेदवाराने अर्ज दाखल केला़
काँग्रेसने पोटनिवडणुकीत माघार घेतल्याने भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादीत चुरस निर्माण झाली आहे़ अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १३ अर्ज आले आहेत़ भाजपाकडून देवानंद कलशेट्टी, हाफिज मन्सुरखान यांनी अर्ज दाखल केला़ यावेळी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, सुधीर धुत्तेकर, आरेफ सिद्दिकी, स्वाती जाधव, शिवसिंह सिसोदिया, अफजल खान यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते़ शिवसेनेकडून वैभव बिराजदार, गणेश स्वामी यांनी अर्ज दाखल केला़ यावेळी नगरसेवक रवी सुडे, विष्णुपंत साठे, सुनिता चाळक आदींची उपस्थिती होती़ राष्ट्रवादी काँग्रेसकडून समीर चांदपाशा सय्यद यांचा अर्ज दाखल करण्यासाठी नगरसेवक शैलेश स्वामी, राजा मणियार, राजेंद्र इंद्राळे, रेखाताई कदम, प्रशांत पाटील, नवनाथ आल्टे, लाला सुरवसे आदींची उपस्थिती होती़ प्रभाग ब चे काँग्रेसचे नगरसेवक विक्रमसिंह चौहाण यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहेत़ पोटनिवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मनपात गर्दी झाली होती़ भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी पदाधिकाऱ्यांसह अर्ज दाखल केला़

Web Title: 13 nominations for 11 candidates for one place in the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.