१३ लाख रुपयांचा गुटखा पकडला

By Admin | Updated: May 27, 2014 01:01 IST2014-05-27T00:53:03+5:302014-05-27T01:01:59+5:30

नवीन नांदेड : या भागातील चंदासिंग कॉर्नर भागात पोलिसांनी दोन ट्रक पकडून त्यातून १३ लाख ३० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला़

13 lakh rupees gutka caught | १३ लाख रुपयांचा गुटखा पकडला

१३ लाख रुपयांचा गुटखा पकडला

नवीन नांदेड : या भागातील चंदासिंग कॉर्नर भागात पोलिसांनी दोन ट्रक पकडून त्यातून १३ लाख ३० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला़ ही कारवाई सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली़ सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, पोउपनि राहुल तायडे, ढाकणे, पोहेकॉ़ कुंडगीर, पोना पठाण, शेख इब्राहिम, सुरेश मेहककर, कांबळे, शेख जावेद, नागरगोजे यांनी धनेगावजवळ एम़एच़२६, एच़६३३७ या क्रमांकाचा ट्रक पकडला़ यावेळी ट्रकचा चालक फरार झाला़ तसेच याठिकाणी पूर्वीपासून उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक एम़एच़२६, एच़६६५५ असे दोन्ही ट्रक ग्रामीण ठाण्यात लावण्यात आले़ या ठिकाणी ट्रकची तपासणी केली असता, त्यात १३ लाख ३० हजार ुरुपयांचा गुटखा आढळला़ सितार-८२ पोते, रजनीगंधा पानमसाला-२ बॉक्स, राजू इलायची-३१ बोरे अशाप्रकारे दोन्ही ट्रकमधून या गुटख्याची वाहतूक करण्यात येत होती़ दरम्यान, या प्रकरणात नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती़ (वार्ताहर)

Web Title: 13 lakh rupees gutka caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.