आॅटो उलटून १३ जखमी
By Admin | Updated: June 22, 2014 00:41 IST2014-06-22T00:35:57+5:302014-06-22T00:41:48+5:30
श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यातील मौजे शेख फरिद वझरा येथील शेख फरिद बाबा दर्गा येथे दर्शनासाठी (न्याज) जात असलेल्या भाविकाच्या आॅटोचे श्री दत्त शिखर घाटात समोरील चाक फुटल्याने अपघात झाला.

आॅटो उलटून १३ जखमी
श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यातील मौजे शेख फरिद वझरा येथील शेख फरिद बाबा दर्गा येथे दर्शनासाठी (न्याज) जात असलेल्या भाविकाच्या आॅटोचे श्री दत्त शिखर घाटात समोरील चाक फुटल्याने अपघात झाला. यात १३ भाविक जखमी झाल्याची घटना २१ जून रोजी दुपारी १२.५० वाजता घडली आहे. यात दोन जण गंभीर जखमी आहेत. कसबा महांगाव ता.दारव्हा जि. यवतमाळ येथील मुस्लीम भाविक श्रद्धास्थान असलेल्या शेख फरिद बाबा दर्गा मौजे वझरा येथे अॅपे आॅटो क्रमांक एम.एच.२९-एम-७५०५ यात बसून येत होते. रेणुकादेवी घाट चढून शिखर संस्थानवरुन पुढे दत्त मांजरीकडे जाणारा घाट उतरत होते. घाटातील रस्त्यात असलेल्या खड्यात समोरील चाक जावून गिट्टी लागून चाक फुटल्याने आॅटो दरीत जावून पडला. अॅटोत बसलेले अ. मुजीब अ. हक यांचा कमरेपासून पाय निकामी झाला. तर म. ईसाक अ. रज्जाक यांच्या कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. यांचेसह अ. हक अ. सत्तार, मलेका परविन, अ. रशिद, जकिया परविन शे. ईसमाईल, संजीता परविन म. अय्युब, फरजाना अ. हक, शे. मोसीन अ. हक, सलमा परविन अ. मुजीब, शे. तनवीर म. अय्युब, पुतलीबी म. ईसाक, शे. मोईन अ. हक व आॅटोचालक अ. हय्यूम अ. कय्यूम हे जखमी झाले आहेत. नागरिकांनी १०८ क्रमांकावर फोन लावून अॅम्ब्युलन्स बोलावल्याने जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात आणले. रुग्णालयत डॉ. एल.डी. नाईक यांनी जखमीवर प्रथमोचार करुन १०८ क्रमांकाच्या अॅम्ब्युलन्स व शासनाच्या अॅम्ब्युलन्सने यवतमाळ येथे पाठविण्यात आले. श्री दत्त शिखर ते शेख फरिद वझरा येथे जाणारा रस्ता जीवघेणा बनल्याने या रस्त्यावर गेल्या महिन्यात पाच अपघात घडले होते. अजुनही सा.बां. विभागने हा रस्ता दुरुस्त केला नसल्याने अपघातांची संख्या वाढतच आहे. (वार्ताहर) जखमींना यवतमाळला पाठविले जखमीवर प्रथमोचार करुन १०८ क्रमांकाच्या अॅम्ब्युलन्स व शासनाच्या अॅम्ब्युलन्सने यवतमाळ येथे पाठविण्यात आले. कसबा महांगाव ता.दारव्हा जि. यवतमाळ येथील मुस्लीम भाविक श्रद्धास्थान असलेल्या शेख फरिद बाबा दर्गा मौजे वझरा येथे अॅपे आॅटो क्रमांक एम.एच.२९-एम-७५०५ यात बसून येत होते.