१३ आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबास आर्थिक मदत
By Admin | Updated: September 15, 2015 00:21 IST2015-09-14T23:42:26+5:302015-09-15T00:21:45+5:30
चाकूर : दुष्काळी परिस्थितीमुळे आत्महत्या केलेल्या तालुक्यातील १३ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना रविवारी प्रत्येकी ११ हजार ४०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

१३ आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबास आर्थिक मदत
चाकूर : दुष्काळी परिस्थितीमुळे आत्महत्या केलेल्या तालुक्यातील १३ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना रविवारी प्रत्येकी ११ हजार ४०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे होते. यावेळी आमदार विनायकराव पाटील, प्राचार्य डॉ. उल्हास शिऊरकर, प्राचार्य डॉ. प्रदीप दुबे, प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार तातेड, जिल्हा बँकेचे संचालक एन.आर. पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बालाजी भोसले, खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन राधाकिशन तेलंग, माजी उपसरपंच मुर्तुजा सय्यद, सुधाकरराव लोहारे, बालाजी सूर्यवंशी, सुभाष काटे, मिलिंद महालिंगे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिमन्यू धोंडगे यांनी केले.
सूत्रसंचालन प्रा. राजेश तगडपल्लेवार यांनी केले. आभार अनिल चव्हाण यांनी मानले. यावेळी डॉ. संतोष भोसले, विनोद वारद, कृउबाचे सभापती प्रशांत पाटील, उपसभापती अशोक चिंते, जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोपाळ माने, विलास सूर्यवंशी, चाँदपाशा मासुलदार, प्रा. सत्यवान धोंडगे, डॉ. शांतीलाल सोनी, संतोष दुरुगकर, नंदकुमार पवार, ज्ञानेश्वर चाकूरकर उपस्थित होते. (वार्ताहर)