वर्षभरात नैराश्येतून १३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By Admin | Updated: December 11, 2014 00:40 IST2014-12-11T00:18:29+5:302014-12-11T00:40:42+5:30

जालना : नापिकी, विविध बँकांची कर्जप्रकरणे यामुळे नैराश्येतून गेल्या वर्षभरात जिल्ह्यात १३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना

13 farmer suicides due to depression during the year | वर्षभरात नैराश्येतून १३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

वर्षभरात नैराश्येतून १३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या


जालना : नापिकी, विविध बँकांची कर्जप्रकरणे यामुळे नैराश्येतून गेल्या वर्षभरात जिल्ह्यात १३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचा धनादेश वाटप करण्यात आल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.
जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाअभावी शेतीतून उत्पन्न मिळत नाही. लागवडीसाठी केलेला खर्चही त्यातून निघत नाही, अशी स्थिती आहे. याही वर्षी खरिपाच्या पिकांमधून फारसे उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे नैराश्येतून या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जानेवारी, फेबु्रवारी, आॅक्टोबर २०१४ या महिन्यांमध्ये प्रत्येकी १ तर मार्च, मे, जून या महिन्यात प्रत्येकी २ आणि जुलै व आॅगस्ट या दोन महिन्यांमध्ये प्रत्येकी ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
या मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाखाची मदत जिल्हा प्रशासनाच्या वतीने तातडीने करण्यात आली. याशिवाय दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रकरणी चौकशीमध्ये कर्जबाजारी किंवा नापिकीमुळे आत्महत्या केली नसल्याचे आढळून न आल्याने दोन प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला पाठविला आहे. (प्रतिनिधी)
गेल्या तीन वर्षापासून या जिल्ह्यात दुष्काळी स्थितीमुळे सर्वसामान्य शेतकरी होरपळून निघाला आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांसह बागायतदारांचेसुद्धा अतोनात नुकसान झाले असून, त्याचा फटका कुटुंबियांबरोबर ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होतो आहे.
४या स्थितीत जिल्हा प्रशासनाने विविध खात्यांद्वारे समन्वयातून प्रत्येक गावासह शेतकऱ्यांपर्यंत सर्वार्थाने मदतीचा हात दिला पाहिजे, असा सूर जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांनी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
४शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज माफी, वीज बीलात माफी तसेच पीक विम्याची रक्कमही खरीप हंगामापूर्वी तात्काळ वितरित व्हावी, शेतकऱ्यांना प्रती एकरी साह्य अनुदान, उपलब्ध करणे नितांत गरजेचे आहे. त्याशिवाय या जिल्ह्यातील खचलेल्या शेतकऱ्यांना पुरेसा आधार मिळणार नाही, असाही सूर उमटत आहे.
४जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील खरीपाच्या पार्श्वभूमीवर बी-बियाणांचे मोफत वाटप. खतामधून सवलतही दिली जावी, असा सूर आहे.

Web Title: 13 farmer suicides due to depression during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.