१३९ रिक्त जागांसाठी भरती सुरू
By Admin | Updated: June 7, 2014 00:24 IST2014-06-06T23:49:14+5:302014-06-07T00:24:50+5:30
जालना : जिल्हा पोलिस यंत्रणेअंतर्गत १३९ रिक्तपदांसाठी ५ हजार ६६ उमेदवारांनी आॅनलाईन प्रणालीव्दारे अर्ज दाखल केले होते. या उमेदवारांची भरती प्रक्रिया शुक्रवारी पहाटे पाचवाजेपासून सुरू करण्यात आली.
१३९ रिक्त जागांसाठी भरती सुरू
जालना : जिल्हा पोलिस यंत्रणेअंतर्गत १३९ रिक्तपदांसाठी ५ हजार ६६ उमेदवारांनी आॅनलाईन प्रणालीव्दारे अर्ज दाखल केले होते. या उमेदवारांची भरती प्रक्रिया शुक्रवारी पहाटे पाचवाजेपासून सुरू करण्यात आली.
जिल्हा पोलिस यंत्रणेने १ मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करून ५ मेपर्यंत आॅनलाईन प्रणालीव्दारे अर्ज मागविले होते. त्यास मोठा प्रतिसाद मिळला असून १३९ रिक्तजागांसाठी ५ हजार ६६ उमदेवारांनी अर्ज दाखल केले. त्यात ४ हजार ५४९ पुरूष व ५१७ महिला उमेदवारांचा समावेश आहे. यापैकी १०३ अर्ज रद्द, २२६ अर्ज अपूर्ण असल्यामुळे बाद ठरविण्यात आले. या भरतीसाठी एकूण ४ हजार ८४९ उमेदवारांना चाचणीसाठी या रिक्तपदांसाठी पात्र ठरविण्यात आले होते.
सर्व्हे नं ४८८ च्या कवायत मैदानावर सकाळपासूनच भरतीची प्रक्रिया सुरू झाली. पहाटेच भरती असल्यामुळे गुरूवारी रात्रीच उमेदवार दाखल झाले होते. सर्वप्रथम आलेल्या उमेदवारांची नावे नोंदवून क्रमांक वितरीत करण्यात आले. उन्हाचे दिवस असल्यामुळे उमेदवारांना बसण्यासाठी मोठा मंडप उभारण्यात आला आहे.
नोंदणीनंतर चाचणीस सुरूवात झाली. सर्वप्रथम छाती, ऊंचीच्या निकषांची पडताळणी करण्यात आली. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुढच्या चाचण्यांसाठी पात्र ठरविण्यात आले. गोळाफेक, धावणे, लांब उडी, उंचउडी आदी चाचण्या घेण्यात आल्या. प्रत्येक चाचणीची व्हिडीओ शुटींग करण्यात आली. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग या भरती प्रक्रियेवर लक्ष ठेऊन होत्या. त्यांनी कवायत मैदानवर भेटही दिली. भरतीची प्रक्रियेची संपूर्ण माहिती घेत, आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, उपअधीक्षक आय.टी. वसावे, यांच्यासह अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
४ हजार ८४९ उमेदवार
खुल्या प्रवर्गासाठी ६२, अनुसूचित जातीसाठी २३, अनु. जमातीसाठी १३, विमुक्ती जमाती ४, भटक्या जमाती ४, भज (क)५, भज (ड)-३, विशेष मागासप्रवर्गासाठी २, इमावप्रवर्गासाठी २३ असे एकूण १३९ रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. दररोत ७०० उमेवारांची चाचणी होणार असून, तब्बत सहा ते सात दिवस ही प्र्रकिया सुरू राहणार आहे.
भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना मोबाईल सोबत बाळगण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कोणत्याही उमेदवाराच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर वरिष्ठ अधिकारी यांचे लक्ष असणार आहे. उमेदवारांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, किंवा कोणत्याही अमिषाला बळी पडू नये असे सांगून पोलिस भरती अत्यंत पारदर्शक होणार असल्याचे वसावे यांनी नमूद केले आहे.