१२७ जणांचे बोगस पास जप्त
By Admin | Updated: July 4, 2014 00:15 IST2014-07-03T23:40:14+5:302014-07-04T00:15:06+5:30
लातूर : अंध, अपंग, कर्णबधिराचे बनावट ओळखपत्र मिळवून त्याअधारे प्रवास करणाऱ्या १२७ जणांचे ओळखपत्र एस़टी़महामंडळाच्या मार्ग तपासणी पथकाने जप्त केले आहेत़

१२७ जणांचे बोगस पास जप्त
लातूर : अंध, अपंग, कर्णबधिराचे बनावट ओळखपत्र मिळवून त्याअधारे प्रवास करणाऱ्या १२७ जणांचे ओळखपत्र एस़टी़महामंडळाच्या मार्ग तपासणी पथकाने जप्त केले आहेत़ या प्रवाशांकडून १८ हजार ७५० रूपये दंड व प्रवास भाडेही वसूल करण्यात आले आहे़ ही मोहिम गेल्या महिनाभराच्या कालावधीत राबविण्यात आली आहे़
प्रवाशांच्या सेवेसाठी असे ध्येय उराशी बाळगून महाराष्ट्र राज्य एस़टी़महामंडळ कार्यरत आहे़ गेल्या काही वर्षांपासून एस़टी़ची चाके आर्थिक अडचणीत रूतली आहेत़ एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत असून, त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे़
सामाजिक बांधिलकी म्हणून एस़टी़ महामंडळाच्या वतीने २४ विविध घटकातील प्रवाशांना प्रवासाच्या तिकिटात सवलत देण्यात येते़ यात अंध, अपंगास ७५ टक्के तर त्यांच्या साथीदारांना ५० टक्के सवलत देण्यात येते़ त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत देण्यात येते़ १ ते ३० जून या कालावधीत मार्ग तपासणी पथकाने बसमधील प्रवाशांची तपासणी केली असता त्यात १२७ प्रवाशाकडे बोगस ओळखपत्र आढळून आले़ या पथकाने हे ओळखपत्र जप्त करून त्यांच्याकडून १८ हजार ७५० रूपये दंड व प्रवासभाडे वसूल केले आहे़ ही मोहिम विभाग नियंत्रक डी़बी़माने यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली़
लांबच्या प्रवासासाठी जास्त वापऱ़़
या पथकात सिद्धेश्वर रासुरे, बापू खुडे, विजय बनसोडे हे सहभागी झाले असून, रात्रीच्यावेळी ही मार्ग तपासणी करण्यात येत आहे़ विशेष म्हणजे लांब पल्ल्याच्या मार्गावर बोगस ओळखपत्रधारकांची संख्या जास्त असल्याचे आढळून आल्याचे सांगण्यात आले़