रेल्वे स्टेशन, विमानतळावर १२७ प्रवाशांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:05 IST2021-04-08T04:05:46+5:302021-04-08T04:05:46+5:30
सरकारी कार्यालयांमध्ये १७ अभ्यागत पॉझिटिव्ह औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे धुळे शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांची तपासणी ...

रेल्वे स्टेशन, विमानतळावर १२७ प्रवाशांची तपासणी
सरकारी कार्यालयांमध्ये १७ अभ्यागत पॉझिटिव्ह
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे धुळे शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांची तपासणी सुरू करण्यात आली. बुधवारी या तपासणीत तब्बल १७ जण पॉझिटिव्ह आढळून आले. मनपा मुख्यालयात ३, पोलीस आयुक्त कार्यालयात ४, उच्च न्यायालयात ५, आरटीओ कार्यालयात २, जिल्हाधिकारी कार्यालयात २, रजिस्ट्री कार्यालयात ४, तर विभागीय आयुक्त कार्यालयात एक पॉझिटिव्ह आढळून आला.
शहरात दाखल होणारे ७६ नागरिक पॉझिटिव्ह
औरंगाबाद : वेगवेगळ्या जिल्ह्यातून शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यात येत आहे. बुधवारी या तपासणीत तब्बल ७६ जण पॉझिटिव्ह आढळून आले. चिकलठाणा १०, हर्सूल टी पॉईंट ३४, कांचनवाडीत १८, झाल्टा फाटा १, नगर नाका १०, दौलताबाद टी पॉईंट येथे ३ जण पॉझिटिव्ह आढळले.