सोळा दिवसात १२७ मि.मी पाऊस
By Admin | Updated: September 17, 2015 00:28 IST2015-09-17T00:25:19+5:302015-09-17T00:28:02+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील सोळा दिवसात ४२ सर्कल मध्ये १२७.९० मि.मि. पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरीप पिकांना थोडाफर दिलासा मिळाला आहे.

सोळा दिवसात १२७ मि.मी पाऊस
उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील सोळा दिवसात ४२ सर्कल मध्ये १२७.९० मि.मि. पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरीप पिकांना थोडाफर दिलासा मिळाला आहे. तसेच तलावात काही प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे. तर मागील चोविस तासात जिल्ह्यात ९.२७ मि.मी पाऊस पडला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत आजवर ३११.३ मि.मी पाऊस झाला असून उस्मानाबाद जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७६७.५ मि.मी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने पुन्हा आगमन केल्याने थोडयाफार का प्रमाणात होईना बळीराजा समाधान व्यक्त करत आहे. उस्मानाबाद तालुक्यातील उस्मानाबाद शहर सर्कलमध्ये सप्टेंबर महिन्यात २१८.मि.मी, उस्मानाबाद ग्रामीण १०६ मि.मी, तेर २५९ मि.मी, ढोकी १७८ मि.मी, बेंबळी १०७ मि.मी, पाडोळी १२० मि.मी, जागजी १७८ मि.मी, केशेगाव ७७ मि.मी उस्मानाबाद तालुक्यात सरासरी १५५.३८ मि.मी पाऊस पडला आहे.
तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर सर्कल मध्ये सोळा दिवसात १०७ मि.मी, सावरगाव १८७ मि.मी, जळक़ोट १३५ मि.मी, नळदुर्ग ७७ मि.मी, मंगरुळ १४० तर सलगरा दि. ७० मि.मी, इटकळ सर्कलमध्ये सोळा दिवसात १४६ असा एकूण तालुक्यात सरासरी १२३ मि.मी पाऊस पडला आहे.उमरगा तालुक्यातील उमरगा सर्कलमध्ये ४७ मि.मी, मुरुम १२९ मि.मी, नारंगवाडी १२३ मि.मी, मुळूज ९६ मि.मी, डाळींब २०५ मि.मी तालुक्यात १२०मि.मी पाऊस पडला.लोहारा तालुक्यात लोहारा सर्कल ९४ मि.मी, माकणी १८६ मि.मी, जेवळी ७१ मि.मी असा लोहारा तालुक्यात ११७ मि.मी पाऊस पडला आहे.कळंब तालुक्यात कळंब सर्कलमध्ये ११६ मि.मी पाऊस पडला, इटकूर ८९मि.मी, शिराढोण १८२ मि.मी, येरमाळा १८२ मि.मी, मोहा १०८ मि.मी, गोविंदपूर १५६ मि.मी असा एकूण १३८.८३ मि.मी पाऊस पडला आहे.
भूम तालुक्यात भूम सर्कलमध्ये १६१.५० मि.मी, ईट ८३ मि.मी, अंबी ७४ मि.मी, माणकेश्वर १५८ मि.मी, वालवड २६ मि.मी असा एकूण १००.५० मि.मी पाऊस सप्टेंबर महिन्यात झाला आहे.वाशी तालुक्यात वाशी सर्कलमध्ये ११७ मि.मी, तेरखेडा २०२ मि.मी, पारगाव ९९ मि.मी असा एकूण १३९.३३ मि.मी पाऊस पडला आहे. परंडा तालुक्यात परंडा १५२ मि.मी, जवळा नि. ११६ मि.मी, अनाळा १२१ मि.मी,सोनारी १२१ मि.मी, आसू १३० असा एकूण परंडा तालुक्यात मागील पंधरा दिवसात १२९ मि.मी पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आठ तालुक्यातील ४२ सर्कलमध्ये १६ सप्टेंबरपर्यंत १२७.९० मि.मी सरासरी पाऊस पडला आहे.