१२५ तोफांची सलामी
By Admin | Updated: April 15, 2016 00:44 IST2016-04-15T00:13:38+5:302016-04-15T00:44:54+5:30
अहमदपूर : विश्वरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त शहरात विविध संस्था, संघटनांच्या वतीने सामाजिक उपक्रमाद्वारे गुरूवारी

१२५ तोफांची सलामी
अहमदपूर : मोटारसायकल रॅली, रक्तदान शिबीर
अहमदपूर : विश्वरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त शहरात विविध संस्था, संघटनांच्या वतीने सामाजिक उपक्रमाद्वारे गुरूवारी अभिवादन करण्यात आले़ मध्यरात्री १२५ तोफांची सलामी देण्यात आली़
विश्वरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस बाजार समितीचे सभापती अॅड़ भारत चामे, उपनगराध्यक्ष कलिमोद्दिन अहमद, नगरसेवक डॉ़ सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले़ यावेळी १२५ तोफांची सलामी देण्यात आली़ यावेळी जयंती समितीचे अध्यक्ष प्रा़ बालाजी आचार्य राजेंद्र कांबळे, अरूण वाघंबर, संजय कांबळे, श्रीकांत बनसोडे, डॉ़ ओमप्रकाश किनगावकर, जगदीश गायकवाड, सुजीत गायकवाड, नगरपरिषदेचे अधीक्षक सतीश बिलापट्टे, नगरअभियंता निजाम शेख यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती़
तसेच सिद्धार्थनगर येथे ध्वजारोहण करून डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले़ अध्यक्षस्थानी प्रा़ श्रीरंग खिल्लारे होते़ यावेळी माजी न्यायमूर्ती केक़े़ कांबळे, जि़प़सदस्य चंद्रकांत मद्दे, नगरसेवक अभय मिरकले, लक्ष्मीकांत कासनाळे, बापू गोखरे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी, बालाजी तुरेवाले, पंचायत समिती सदस्य वैषाली तुरेवाले, प्रा़डॉ़ नारायण कांबळे आदी उपस्थित होते़
नगरपरिषद : शहरातील नगरपरिषदेत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस नगराध्यक्षा ललिता पुणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले़ यावेळी नगरसेविका सरस्वती कांबळे, डॉ़ सिद्धार्थकुमार सूर्यवंशी मिनाक्षी शिंगडे, माजी सभापती अॅड़ टी़एऩ कांबळे, राजेंद्र कांबळे, सतीश बिलापट्टे, आऱजे़ कांबळे, भरत ठाकूर आदी उपस्थित होते़ तसेच सिद्धार्थनगर येथे प्रा़ दीपक बेले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले़ यावेळी बाबासाहेब कांबळे, चंद्रकांत मद्दे, संतोष शेप, अॅड़ रमेश गायकवाड, बबलू शेख, गोविंद गिरी उपस्थित होते़ (वार्ताहर)
शिबिरात २५ जणांचे रक्तदान
भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले़ यावेळी २५ जणांनी रक्तदान केले़ उद्घाटन नगरसेवक अभय मिरकले यांच्या हस्ते झाले़ यावेळी बाबासाहेब कांबळे, नगरसेवक लक्ष्मीकांत कासनाळे, प्रा़ श्रीरंग खिल्लारे, बालाजी तुरेवाले, प्रा़ रूपसेन कांबळे, माधव तिगोटे, जी़एऩ भालेराव आदी उपस्थित होते़ तसेच मोटारसायकल रॅलीही काढण्यात आली़ यशस्वीतेसाठी चंद्रशेखर भालेराव राजपाल गायकवाड, श्रीकांत कांबळे, विनोद गायकवाड, अंकुश शिंदे, बाळू डोंगरे, रोहित कांबळे, महेंद्र धसवाडीकर, नामदेव साबणे आदींनी परिश्रम घेतले़