१२५ कृषीपंपांचा वीजपुरवठा तोडला
By Admin | Updated: November 6, 2014 01:35 IST2014-11-06T00:37:10+5:302014-11-06T01:35:57+5:30
परळी : तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने शेतीचा पाणीपुरवठा बंद केला आहे.

१२५ कृषीपंपांचा वीजपुरवठा तोडला
परळी : तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने शेतीचा पाणीपुरवठा बंद केला आहे. बुधवारी नागापूर, मोहापाठोपाठ बोधेगाव प्रकल्पावरील १२५ कृषीपंपांचा वीजपुरवठा तोडत कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
तालुक्यात मोहा, नागापूर, बोधेगाव हे महत्वाचे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांवर परिसरातील गावे विसंबून आहेत. खरीपापाठोपाठ रबी हंगामातही पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. अशा स्थितीत पिण्याच्या पाण्याची सोय महत्वाची आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने अनाधिकृत पाणी उपसा बंद करणे सुरू आहे.
दोन दिवसापूर्वीच मोहा प्रकल्पातील ४० कर्मचाऱ्यांच्या पथकांनी शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडीत केला होता. पाठोपाठ नागापूर मध्यम प्रकल्पातही अशाच प्रकारची कारवाई झाली होती. त्यानंतर बोधेगाव येथेही कारवाई करण्यात आली.
महसूल, पोलीस, पाटबंधारे विभाग, महावितरण कंपनीच्या पथकाने बुधवारी बोधेगाव प्रकल्पांतर्गत अनाधिकृत पाणी उपसा करणाऱ्या १३० कृषीपंपांचा वीजपुरवठा तोडला. (वार्ताहर)
अन्य प्रकल्पातील पाण्याचा साठाही पिण्यासाठी आरक्षित करण्यात येणार आहे.
४त्यासाठी अनाधिकृत पाणी उपशावर कारवाया सुरूच राहतील.
४कासारवाडी, बोरणा प्रकल्पावरही मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य पाणीउपसा सुरू आहे.
४जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून या कारवाया सुरू आहेत.
४कमी पावसामुळे पाणी समस्या बिकट होऊ नये यासाठी या उपाययोजना करणे सुरू आहे.
४कोणालाही वेठीस धरण्याचा प्रश्न नाही, असे नायब तहसीलदार बी. एल. रुपनर म्हणाले.