१२५ कोटींचा आॅनलाईन वीज बिल भरणा

By Admin | Updated: May 4, 2016 01:30 IST2016-05-04T01:22:15+5:302016-05-04T01:30:43+5:30

औरंगाबाद : राज्यभरात महावितरणच्या ग्राहकांनी आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये ३४८२ कोटी ५८ लाख रुपयांचा आॅनलाईन वीज बिलाचा भरणा केला आहे

125 billions online bill payment | १२५ कोटींचा आॅनलाईन वीज बिल भरणा

१२५ कोटींचा आॅनलाईन वीज बिल भरणा


औरंगाबाद : राज्यभरात महावितरणच्या ग्राहकांनी आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये ३४८२ कोटी ५८ लाख रुपयांचा आॅनलाईन वीज बिलाचा भरणा केला आहे. यामध्ये औरंगाबाद परिमंडळात १२५ कोटी रुपयांचा आॅनलाईन भरणा झाल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे.
आॅनलाईन वीज बिलाच्या भरणामध्ये पुणे, भांडूप व कल्याण परिमंडळ आघाडीवर आहे. गेल्या वर्षभरात पुणे ८६० कोटी, भांडूप ७४७ कोटी तर कल्याण परिमंडळात ५५१ कोटी रुपयांचा भरणा झाला आहे. तसेच नाशिक परिमंडळात २७१ कोटी, नागपूर ११८ कोटी, कोल्हापूर १३५ कोटी, बारामती १५१ कोटी आणि औरंगाबाद परिमंडळातून १२५ कोटी रुपयांचा आॅनलाईन वीज बिलाचा भरणा झाला आहे.

Web Title: 125 billions online bill payment