१२२ वीजचोर जाळ्यात

By Admin | Updated: May 8, 2014 23:31 IST2014-05-08T23:31:08+5:302014-05-08T23:31:16+5:30

उस्मानाबाद : केवळ जिल्ह्यातच नव्हे तर शेजारील जिल्ह्यात होणारी वीजचोरी रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या भरारी पथकाने चार महिन्यात १२२ वीजचोरांना कारवाईचा शॉक दिला आहे़

122 power burns | १२२ वीजचोर जाळ्यात

१२२ वीजचोर जाळ्यात

उस्मानाबाद : केवळ जिल्ह्यातच नव्हे तर शेजारील जिल्ह्यात होणारी वीजचोरी रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या भरारी पथकाने चार महिन्यात १२२ वीजचोरांना कारवाईचा शॉक दिला आहे़ या वीजचोरांवर ६ लाख, ७६ हजार ८०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे़ तर ५६ जणांकडून ४ लाख, ६ हजारांचा दंड वसूल केला आहे़ या पथकाने सलग दोन वर्षे धडाकेबाज कारवाई करून विभागात अव्वल क्रमांक मिळविला आहे़ महावितरणच्या वतीने वीजचोरी करणार्‍यांविरूध्द कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे़ पुणे विभागांतर्गत उस्मानाबाद येथील उपकार्यकारी अभियंता आऱडीग़ाढवे यांच्या नेतृत्वाखाली फिरते पथक कार्यान्वित करण्यात आले आहे़ गाढवे व त्यांचे सहकारी जी़व्हीक़ांबळे, बी़एमक़ाळगी, जे़बीग़ॅडद, एम़एक़ादरी, जे़आरक़ाटकर यांच्या पथकाने उस्मानाबाद, लातूर व सोलापूर जिल्ह्यातील १२२ वीजचोरांवर कारवाई केली आहे़ यात जानेवारी महिन्यात ५६ जणाविरूध्द कारवाई करून ४ लाख, ६ हजाराचा दंड करण्यात आला आहे़ यात उस्मानाबाद जिल्ह्यातील ९६ (५ लाख, ६२ हजार १३८ दंड) जणांवर कारवाई करून ५२ जणांकडून ३ लाख, ८९ हजार ११५ रूपये दंडाची वसुली करण्यात आली आहे़ सोलापूर जिल्ह्यात १३ ठिकाणी कारवाई करून ४८ हजाराचा दंड केला आहे़ त्याचप्रमाणे चार जणांकडून १६ हजार ९२० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे़ लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात १३ वीजचोरांवर कारवाई करून ६३०६ रूपयांचा दंड करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी) ६६ वीजचोरांवर गुन्हे अनधिकृतरीत्या दुकान, घर आदी विविध ठिकाणी चोरून वीज वापरणार्‍या ६६ जणांवर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ यात उस्मानाबाद जिल्ह्यातील ४४, सोलापूर जिल्ह्यातील ९ तर निलंगा तालुक्यातील १३ जणांचा समावेश आहे़ १२ लाख ३२ हजार रूपयांचा दंड वसूल पुणे विभागांतर्गत उस्मानाबादेत कार्यरत असलेले फिरते पथक कारवाईत सलग दोन वर्षे आघाडीवर राहिले आहे़ सन २०१२-१३ मध्ये ३२६ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली होती़ यातील २२७ जणांकडून ११ लाख, ८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला़ तर सन २०१३-१४ मध्ये २६४ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली़ यातील १८२ जणांकडून १२ लाख, ३२ हजाराचा दंड वसूल करण्यात आला होता़

Web Title: 122 power burns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.