परळीत २१ जागांसाठी १२१ जण मैदानात

By Admin | Updated: March 28, 2015 00:46 IST2015-03-28T00:12:33+5:302015-03-28T00:46:26+5:30

परळी : वैद्यनाथ साखर कारखाना संचालक पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात स्वत:ची उमेदवारी दाखल केली.

121 people are fielded for 21 seats in Parli | परळीत २१ जागांसाठी १२१ जण मैदानात

परळीत २१ जागांसाठी १२१ जण मैदानात


परळी : वैद्यनाथ साखर कारखाना संचालक पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात स्वत:ची उमेदवारी दाखल केली. शिवाय स्वतंत्र पॅनलही आखाड्यात उतरविला आहे. २१ जागांसाठी १२१ जण आखाड्यात आहेत.
गुरूवारी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी नाथ्रा गटातून उमेदवारी अर्ज दाखल केली होती. धनंजय मुंडे यांनी देखील नाथ्रा गटातूनच उमेदवारी दाखल केली. धनंजय यांचे वडिल पंडितराव मुंडे हे देखील मैदानात आहेत. शिवाय पंकजा यांच्या धाकट्या भगिनी अ‍ॅड. यशश्री मुंडे यांनी देखील उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे पिता-पुत्र विरूद्ध बहिणींमध्ये थेट लढत आहे. माजी उपाध्यक्ष फुलचंद कराड, नामदेवराव आघाव, माजलगावचे आ. आर. टी. देशमुख हे देखील नशीब आजमावत ेआहेत.
३० मार्च रोजी छाननी
३० मार्च रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. ३१ मार्च रोजी नामनिर्देशन पत्राची सूची प्रसिध्द होईल. १ ते १५ एप्रिल दरम्यान उमेदवारी मागे घेता येईल.(वार्ताहर)

Web Title: 121 people are fielded for 21 seats in Parli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.