१२० हेक्टर क्षेत्र आले सिंचनाखाली...!

By Admin | Updated: April 9, 2017 23:29 IST2017-04-09T23:28:24+5:302017-04-09T23:29:37+5:30

भोकरदनतालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान योजना राबविली.

120 hectare area came under irrigation ...! | १२० हेक्टर क्षेत्र आले सिंचनाखाली...!

१२० हेक्टर क्षेत्र आले सिंचनाखाली...!

फकिरा देशमुख  भोकरदन
तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान योजना राबविली. या योजनेंतर्गत तालुक्यात नदी नाल्यांचे खोलीकरण व रूंदीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. तालुक्यात नाम फाऊंडेशन, इंडियन पल्सेस अँड ग्रेस असोसिएशन मुंबई यांनी केलेल्या कामांमुळे तालुक्यातील सिंचन क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे़ सुमारे १२० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.
२० गावांमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा़ रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नामुळे सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून नदी व नाले खोलीकरणाची कामे करण्यात आली होती. त्यासाठी नाम फाऊंडेशन व इंडियन पल्सेस अँड ग्रेस असोसिएशन यांनी पोकलेनद्वारे कामे केली तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी डिझेलसाठी निधी जमा करून ही कामे करून घेतली आहे. त्यामध्ये पिंपळगाव रेणुकाई गावामध्ये तब्बल १४़५ किलोमीटर नदी व नाल्याचे खोलीकरण करण्यात आले मात्र या परिसरामध्ये पाऊस कमी झाला व नाल्यांना पूर आला नाही. त्यामुळे पाणीसाठा झाला नाही. मात्र इंडियन पल्सेस अ‍ॅन्ड ग्रेस असोसिएशन या मुंबई येथील सेवाभावी संस्थेच्या वतीने पारध बु येथील रायघोळ नदीचे खोलीकरण व रूंदीकरण करण्यात आले.

Web Title: 120 hectare area came under irrigation ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.