१२ शाळा आयएसओच्या दिशेने

By Admin | Updated: January 15, 2016 23:38 IST2016-01-15T23:37:17+5:302016-01-15T23:38:59+5:30

विठ्ठल फुलारी, भोकर लोकमत लोकसहभाग यातून शिवनगरतांडा येथील शाळा आयएसओ झाली असून याच शाळेचा वसा घेवून आता हळदा केंद्रातील १२ शाळा आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत़

12 towards the school ISO | १२ शाळा आयएसओच्या दिशेने

१२ शाळा आयएसओच्या दिशेने

विठ्ठल फुलारी, भोकर
लोकमत लोकसहभाग यातून शिवनगरतांडा येथील शाळा आयएसओ झाली असून याच शाळेचा वसा घेवून आता हळदा केंद्रातील १२ शाळा आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत़ यासाठी शिक्षकांची पदरमोड व पालकांचा आर्थिक सहभाग जुळून येत आहे़ याचबरोबर ग्रामपंचायतही शाळेसाठी मदत करणार आहे़
जिल्ह्यातील पहिली आयएसओ म्हणून शिवनगरतांड्याचा शाळेला मान मिळाला़ यासाठी या शाळेचे मुख्याध्यापक व्ही़ एऩ चौहान, सहशिक्षक शिवानंद वाडकर या सोबत येथील कुडाच्या घरात राहणारे ग्रामस्थ आर्थिक बोजा उचलला़ या शाळेची प्रगती चालू असल्याने आता हळदा केंद्रातील १२ शाळा आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी पाऊल टाकत आहेत़ यासाठी शिवनगरचे मुख्याध्यापक व्ही़ए़चौहाण हे प्रत्येक शाळेला भेटी देत मार्गक्रमण करीत आहेत़ याबाबत धारजनी, हाडोळी व हळदा येथे बैठकी झाल्या असून लामकाणी येथे कामाला सुरुवातही झाली आहे़ माझी ई-शाळा अंतर्गत हळदा, लामकाणी, मोघाळी, हाडोळी, कामनगाव, धारजनी, नांदा बु़, इळेगाव, धारजनीतांडा, नांदा बु़ तांडा, कुदळातांडा, सोसायटीतांडा येथील शाळेत डिजिटल रुम, टॅबलेट लर्निंग, संगणक कक्ष, स्कूल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, वायफाय या माध्यमातून विद्यार्थ्यांना जिवंत चित्राद्वारे अध्ययन, अध्यापनात मदत होणार आहे़
याचबरोबर आर्टरुम, सायन्सरुम, सब्जेक्टरुम, संगीतरुम, स्पोर्टरुम, वाचनालय व मीडिया सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळून देण्यासाठी व त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे़ शाळेच्या भौतिक सुविधेत वाढ होवून शाळा सुंदर व आकर्षक करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे़ याचसोबत ज्ञानरचनावाद, ई-लर्निंग व परंपरागत शिक्षण याच्या एकत्रित वापरातून स्वेच्छिक अध्ययनची रचना करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करण्यात येत आहे़ या कामासाठी कोणताच शासकीय निधी नसला तरी या सर्व शाळेतील शिक्षक पदरमोड करून व पालकांचे आर्थिक साह्य घेवून वाटचाल करीत आहेत़ यासाठी ग्रामपंचायतच्या वसुलीमधूनही मदत मिळणार आहे़
या कामासाठी केंद्रप्रमुख बी़ एऩ जाधव, मुख्याध्यापक के़ जी़ पेनलोड, आऱ के़ गायकवाड, आऱ आऱ सोनकांबळे, पी़ जी़ जोंधळे, पी़ एम़ कोळी, के़ व्ही़ कुलकर्णी, जी़ यु़ सोळंके, एस़ एल़ कंचकलवाड, आऱ एम़ आडे, बी़ बी़ उपर्वद, एस़ एस़ रणवीर, जी़ टी़ चाबुकस्वार यासह या शाळेतील सर्व शिक्षक या शाळा १०० टक्के प्रगत करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे़
एकाच केंद्रातील सर्वच शाळा आयएसओच्या मानांकनासाठी प्रयत्न सुरू झाल्याने जिल्ह्यासाठी शिक्षण विभागाची ही एक क्रांती ठरणार आहे़

Web Title: 12 towards the school ISO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.