१२ हजार जणांनी घेतली स्वच्छतेची शपथ
By Admin | Updated: September 29, 2014 00:41 IST2014-09-29T00:28:10+5:302014-09-29T00:41:31+5:30
लातूर : जिल्हा परिषदेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मिशन स्वच्छ भारत या प्रकल्पाची सुरुवात गुरुवारपासून करण्यात आली

१२ हजार जणांनी घेतली स्वच्छतेची शपथ
लातूर : जिल्हा परिषदेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मिशन स्वच्छ भारत या प्रकल्पाची सुरुवात गुरुवारपासून करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सदस्य, ग्रामस्थ अशा १२ हजार लोकांनी घेतली स्वच्छतेची शपथ घेतली आहे़
लातूर जिल्हा परिषदेअंतर्गत निर्मल भारत अभियान प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मिशन स्वच्छ भारतची सुरुवात करण्यात आली असून या प्रकल्पाअंतर्गत १० कलमी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे़ जिल्ह्यातील ७८७ ग्रामपंचायतीमध्ये २ आॅक्टोबर रोजी स्वच्छता ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहेत़ जिल्ह्यातील १२७७ शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छता शपथ देण्यात येणार असून हात धुवा कार्यक्रमाअंतर्गत प्रात्यक्षीक घेण्यात येणार आहे़ जिल्ह्यातील निर्मल न झालेल्या ६५१ ग्रामपंचायतमधील प्रत्येकी पाच प्रमाणे नव्याने ३२५५ शौचालये सुरु केली जाणार आहेत़ घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत २६ अपुर्ण कामे पुर्ण करुन ३३ कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे़ सुवर्ण मोहत्सवी दलित वस्ती योजनेअंतर्गत २३ गावातील १४५० वैयक्तिक शौचालयाची बांधकामे व नळ जोडणी कामे अभियान कालावधीत पुर्ण करण्यात येणार आहेत़ (प्रतिनिधी)