शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

बांधकाम विभागाचे मराठवाड्यासाठीचे १२ हजार ९३८ कोटींचे पॅकेज गुलदस्त्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 12:04 IST

आज बैठक : मंत्रिमंडळ बैठकीत विभागासाठी घोषित केले होते अनुदान

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त घेतलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विभागासाठी ४५ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करून ११ महिने झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे त्यावर काहीही निर्णय झाला नाही. शासनाने निवडणुकीनंतरही निर्णय घेतला नाही. या पॅकेजमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागासाठी १२ हजार ९३८ कोटी ८५ लाखांचे अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली होती. त्यापैकी किती रक्कम दिली, याबाबत बांधकाम विभागाच्या प्रादेशिक विभागाकडे काहीही माहिती नाही. विभागाने शासनाकडे काय मागण्या केल्या, किती तरतूद केली, अध्यादेशात काय मिळाले, अर्थसंकल्पातील तरतुदींचे काय झाले, विभागाची देणी किती आहे. या सगळ्यांची जमवा-जमव करण्यासाठी बुधवारी मुख्य अभियंता कार्यालयाची धावपळ सुरू होती.

बांधकाम विभागाकडे काम नाही....मराठवाड्यासाठी काय मागण्या मांडणार, निर्णय होणार, याबाबत सूत्रांनी सांगितले, तसे काही विशेष नाही. कोकण विभाग, महामंडळ, हॅम अंतर्गत रोडचे कामे होत आहेत. सगळ्या महामंडळांना बळकट केल्यामुळे बांधकाम विभागाकडे आस्थापना सांभाळण्यासह खड्डे बुजविणे, देखभाल दुरुस्ती करणे, ०३, ०४ अंतर्गत रस्ते बांधणे, इमारती बांधण्यापलीकडे फारसे काम शिल्लक राहिलेले नाही.

बांधकाम मंत्री आज शहरात२२ ऑगस्ट रोजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण बांधकाम विभागाच्या छत्रपती संभाजीनगर व नांदेड विभागांतर्गत आढावा बैठक घेणार आहेत. बैठकीनंतर ते दुपारी ३ वाजता पुण्याला रवाना होणार आहेत. मंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच येथे येऊन बैठक घेत आहेत. मंत्रिमंडळातील बैठकीत काय घोषणा केल्या, त्याबाबत चव्हाण काय चर्चा करतात, याकडे लक्ष आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMONEYपैसा