छेडछाड करणारे १२ जण ताब्यात

By Admin | Updated: February 3, 2017 00:36 IST2017-02-03T00:32:44+5:302017-02-03T00:36:26+5:30

बीड : मुलींची छेड काढणाऱ्या १२ जणांना गुरुवारी महिला गस्त पथकाने दणका दिला.

12 people abducted | छेडछाड करणारे १२ जण ताब्यात

छेडछाड करणारे १२ जण ताब्यात

बीड : मुलींची छेड काढणाऱ्या १२ जणांना गुरुवारी महिला गस्त पथकाने दणका दिला. अंबाजोगाई, केज येथे ही कारवाई करण्यात आली.
मुली- महिलांच्या छेडछाडीला आळा घालण्यासाठी तीन महिला गस्त पथक तैनात केले आहेत. या पथकास स्वतंत्र वाहन व मोबाईल देण्यात आला आहे. या पथकाने ठिकठिकाणी धडक कारवाया सुरु केल्या आहेत. गुरुवारी पथक अंबाजोगाई व केज येथे धडकले. शाळा- महाविद्यालय व कोचिंग क्लासेस परिसरात मुलींची छेड काढणाऱ्या तसेच टवाळखोरी करणाऱ्या १२ जणांवर कारवाई केली. केजमध्ये शिवाजी चौकातून शहबाज तांबोळी, खदीर शेख, राजू पठाण, पवन हंकारे, अजय कदम, प्रवीण डोईफोडे, सचिन खराडे या सात जणांना पकडले. तर अंबाजोगाईत पाच जणांना ताब्यात घेतले. गणेश पुरी, आदित्य पालवे, करण गोडबोले, आशिष कुमार, अरविंद उमाप यांचा समावेश आहे. न्यायालयाने त्यांना प्रत्येकी ३०० रुपये दंड ठोठावला. मुलींनी छेडछाडीविरुद्ध तक्रारी कराव्यात असे आवाहन गस्त पथकाच्या प्रमुख सहायक निरीक्षक विशाखा धुळे यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: 12 people abducted