एका जागेवर १२ इच्छुकांची दावेदारी़़!

By Admin | Updated: June 11, 2014 00:26 IST2014-06-10T23:57:05+5:302014-06-11T00:26:51+5:30

लातूर : महानगरपालिकेच्या प्रभाग १३ च्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एका जागेसाठी १२ अर्ज दाखल झाले आहेत़

12 interested claimants in one place! | एका जागेवर १२ इच्छुकांची दावेदारी़़!

एका जागेवर १२ इच्छुकांची दावेदारी़़!

लातूर : महानगरपालिकेच्या प्रभाग १३ च्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एका जागेसाठी १२ अर्ज दाखल झाले आहेत़ काँग्रेसकडून प्रफुल्ल कांबळे व भाजपाकडून तुषार गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे़ बसपा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी दाखल केली असली पक्षाचा एबी जोडण्यात आलेला नाही़ भाजपाच्या उमेदवारीचा निर्णय अचानक बदलल्याने कार्यकर्त्यांत काहीसा संभ्रम निर्माण झाला होता़
प्रभाग १३ मध्ये काँग्रेसचे अ‍ॅड़ व्यंकट बेद्रे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने पोटनिवडणूक लागली आहे़ उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार शेवटचा दिवस होता़ दुपारी ३ वाजेपर्यंत १२ अर्ज दाखल करण्यात आली आहेत़ त्यात काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल कांबळे यांनी दोन व भाजपाचे तुषार गायकवाड यांनी एक अर्ज दाखल केला आहे़
त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्चना दत्तू आल्टे, शिवप्रसाद श्रृंगारे, भाजपाकडून जितेंद्र कांबळे, बालाजी शिंदे, नितीश वाघमारे, काँग्रेसकडून राहुल कावळे, बहुजन समाज पार्टीच्या वतीने विजय अजनीकर व दत्तू आल्टे, विठ्ठल भोसले, बालाजी शिंदे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे़
मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेले बसपाचे उमेदवार विजय अजनीकर यांनी दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केली आहे़ तसेच भाजपाचे जितेंद्र कांबळे, राष्ट्रवादीचे शिवप्रसाद श्रृंगारे हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत़ एकूण ११ जणांनी १२ अर्ज दाखल केले आहेत़ उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे़ अर्ज माघारी घेण्यासाठी १३ जून शेवटची तारीख आहे़
उमेदवारी दाखल करण्याचा मंगळवार शेवटचा दिवस असल्याने महानगरपालिकेत सकाळी ११ वाजल्यापासून पक्ष कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती़ उपमहापौर सुरेश पवार यांच्या दालनात दिवसभर गर्दी होती़ (प्रतिनिधी)
‘एबी फॉर्म’साठी काँग्रेस, भाजपाकडून वेटिंग़़़
काँगे्रस पक्षाकडे पोटनिवडणुकीत उमेदवारीसाठी ९ जण इच्छुक होते़ कार्यकर्त्यांकडून बंडखोरी होऊ नये, यासाठी शेवटच्या तासाभरात उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ त्यानुसार शेवटपर्यंत इच्छुकांना खेळवत ठेवण्यात आले होती़ जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ व्यंकट बेदे्र,गटनेते नरेंद्र अग्रवाल, शहराध्यक्ष अ‍ॅड़ समद पटेल, उपमहापौर सुरेश पवार, स्थायी सभापती अख्तर मिस्त्री, विक्रांत गोजमगुंडे, केशरबाई महापुरे, अहेमदखाँ पठाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते़
दुसरीकडे भाजपाचे शहराध्यक्ष सुधीर धुत्तेकर यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून नितीश वाघमारे यांची उमेदवारी जाहीर करून एबी त्यांनाच देण्यात असल्याचे माध्यमाशी बोलताना सांगितले होते़ मात्र, दहा मिनिटांतच तुषार गायकवाड भारतीय जनता पार्टीचा एबी फॉर्म घेऊन पोहोचले़ त्यानंतर शहराध्यक्षांसह अन्य पदाधिकारी या विषयावर संभ्रमावस्थेत होते़ यावेळी अनिल पतंगे, प्रदीप मोरे, शिवसिंह सिसोदिया, देवीदास काळे, संतोष ठाकूर आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते़
मागील निवडणुकीत काँग्रेसचे अ‍ॅड़व्यंकट बेद्रे या प्रभागातून निवडून आले होते़ त्यांचे जात प्रमाणपत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर याठिकाणी पोटनिवडणूक लागली आहे़ गतवेळी ९ उमेदवार रिंगणात होते़ यावेळी कितीजण राहणार, हे १३ जूनला स्पष्ट होईल़

Web Title: 12 interested claimants in one place!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.