शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरमधील बीड बायपासच्या सर्व्हिस रोडवर ११८ अतिक्रमणांवर वरवंटा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 18:48 IST

मनपाने पूर्वसूचना दिल्यानंतरही व्यापाऱ्यांची दुकाने जैसे -थे

छत्रपती संभाजीनगर : महापालिका प्रशासनाने शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी मंगळवारपासून व्यापक मोहीम सुरू केली. या मोहिमेचा श्रीगणेशा बीड बायपासच्या उत्तर दिशेपासून झाला. देवळाई चौक ते महानुभव आश्रमापर्यंत ११८ अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. बुधवारी सकाळी ९ वाजेपासून पुन्हा याच भागात मोहीम सुरू होणार आहे.

महानगरपालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी शहरातील मुख्य रस्त्यांवर होणारी वाहतूककोंडी लक्षात घेत अतिक्रमणे काढण्याचे निर्देश दिले. चार दिवसांपूर्वीच मनपाने कोणत्या रस्त्यांवर कारवाई करणार याचे जाहीर प्रकटन दिले होते. व्यापाऱ्यांनी स्वत:हून आपली अतिक्रमणे काढली नाहीत. मंगळवारी सकाळी ११ वाजता देवळाई चौकात नागरी मित्र पथकाचे ४० कर्मचारी, अतिक्रमण हटाव विभागाचे २०, नगररचना विभागाचे ३, अतिक्रमण हटावचे ५ अधिकारी, ४ जेसीबी, २ टिप्पर, विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी हायड्रोलिक वाहन असा, ताफा दाखल झाला. देवळाई चौकातील भुयारी मार्गाच्या बाजूने, वरच्या भागात दुकानांची अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. यावेळी जमावाने विरोध करण्याचा प्रयत्न केला. विरोध मोडून कारवाई केली.

१ लाख ३५ हजार दंडसर्व्हिस रोडवर असलेली दुकाने एकानंतर एक पाडण्यास सुरुवात केली. लहान मोठे गॅरेज, हॉटेल्स, बँकांचे अतिरिक्त बांधकाम, रुग्णालये, शेड, टपऱ्या आदी अतिक्रमण पाडण्यात आले. या कारवाईत व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काही व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत १ लाख ३५ हजार रुपये दंडही वसूल केला. ही कारवाई सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे, उपायुक्त सविता सोनवणे, सहायक आयुक्त भरत भिरारे, राहुल जाधव, अर्जुन गिराम, नगररचना विभागाचे अभियंता शिवाजी लोखंडे, सौरभ साळवे, सुरज संवदकर, इमारत निरीक्षक शिवम घोडके, कुणाल भोसले, रवींद्र देसाई, सागर श्रेष्ठ, अशोक कदम, नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांनी केली.

आज दक्षिण बाजूला कारवाईमंगळवारी बीड बायपासवर उत्तर दिशेला कारवाई केली. बुधवारी सकाळी ९ वाजेपासून दक्षिण दिशेला म्हणजेच बजाज हॉस्पिटलकडील भागात कारवाई करण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे असे आवाहन अतिक्रमण हटाव विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी केले.

जालना रोड, पैठण रोडबीड बायपास रोडवरील कारवाई पूर्ण झाल्यानंतर जालना रोडवर कारवाई करण्यात येणार आहे. जालना रोडवर दोन्ही बाजूने कारवाई पूर्ण होताच पैठण रोडकडे मोर्चा वळविण्यात येणार असल्याचे मनपातर्फे कळविण्यात आले.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर