११७ पाणीयोजना कार्यान्वित होणार
By Admin | Updated: September 23, 2014 01:33 IST2014-09-23T00:54:19+5:302014-09-23T01:33:48+5:30
हिंगोली : जिल्ह्यात २00६ पासून जवळपास ११७ पाणीपुरवठा योजना रखडलेल्या अवस्थेतच आहेत. तर याशिवाय ११0 योजना मागील काही दिवसांत नव्याने सुरू झाल्या आहेत.

११७ पाणीयोजना कार्यान्वित होणार
हिंगोली : जिल्ह्यात २00६ पासून जवळपास ११७ पाणीपुरवठा योजना रखडलेल्या अवस्थेतच आहेत. तर याशिवाय ११0 योजना मागील काही दिवसांत नव्याने सुरू झाल्या आहेत. जुन्या योजना कार्यान्वित करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर काम हाती घेतले आहे.
जिल्ह्यात पाणीपुरवठा योजना मोठ्या प्रमाणात मंजूर झाल्या. यापूर्वी जलस्वराज्यमध्येही अनेक गावची कामे झाली. त्यानंतर राष्ट्रीय पेयजल व इतर योजनांतून नवीन कामांची भर पडली. मात्र ही कामे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी पूर्वी कोणी फारसे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे तब्बल ११७ योजनांचे काम रखडलेले आहे. त्यातील बहुतांश अंतिम टप्प्यात आहेत. परंतु समितीतील पदाधिकाऱ्यांमध्ये असलेला बेबनाव, प्रशासकीय अधिकाऱ्यांची उदासीनता, गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारी आदी कारणांमुळे या योजना पूर्ण झाल्या नाहीत. अनेक ठिकाणी समितीचा वादच कारणीभूत होता. त्याचा परिणाम म्हणून ठप्प झालेली कामे पुन्हा सुरू झाली नाहीत.
समित्यांकडे अग्रीम दिलेला असल्याने रक्कमही तशीच पडून राहिली अथवा तिचा वापर इतरत्र झाला. मात्र आता या योजना पूर्ण करण्यासाठी कारवाईचा बडगाही उगारला जाण्याची शक्यता आहे.