११६८२३ गारपीटग्रस्तांचे वीजबिल माफ

By Admin | Updated: May 14, 2014 00:53 IST2014-05-14T00:47:55+5:302014-05-14T00:53:51+5:30

उस्मानाबाद: जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अवकाळी पाऊस, गारपिटीचा मोठा फटका बसल्याने शासनाने जानेवारी ते जून या सहा महिन्यांचे कृषीचे वीजबिल माफीचा निर्णय घेतला होता़

116823 Hail For Electricity Bill | ११६८२३ गारपीटग्रस्तांचे वीजबिल माफ

११६८२३ गारपीटग्रस्तांचे वीजबिल माफ

उस्मानाबाद: जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अवकाळी पाऊस, गारपिटीचा मोठा फटका बसल्याने शासनाने जानेवारी ते जून या सहा महिन्यांचे कृषीचे वीजबिल माफीचा निर्णय घेतला होता़ महसूलकडून महावितरण कंपनीला प्राप्त झालेल्या याद्यांनुसार जिल्ह्यातील १ लाख, १६ हजार, ८२३ शेतकर्‍यांना तब्बल १७ कोटी, ४२ लाख, ८८ हजार १७७ रूपयांची वीजबिल माफी मिळाली आहे़ यंदा अवकाळी पावसाने न भूतो न भविष्यती जिल्ह्यात धुमाकूळ घातला अनेक नागरिकांचा विजा पडल्याने बळी गेला तर शेकडो जनावरे दगावली़ अनेक शेतकर्‍यांनी नुकसानीकडे पाहत झालेल्या आर्थिक बोजामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली़ अवकाळीचे रौद्र रूप आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्या आदी बाबी लक्षात घेऊन शासनाकडून तत्काळ नुकसानेचे, घटनेचे पंचनामे करून शेतकर्‍यांना अनुदान वाटपाचे काम हाती घेण्यात आले़ त्याच कालावधीत सहा महिन्याचे कृृषीचे वीजबिल माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता़ या निर्णयामुळे शेतकर्‍यांना काही अंशी दिलासा मिळाला़ यात महावितरण कंपनीच्या उस्मानाबाद व तुळजापूर विभागांतर्गत १ लाख, १६ हजार ८२३ गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना या निर्णयाचा लाभ मिळाला आहे़ यात उस्मानाबाद विभागांतर्गत उस्मानाबाद शहरांतर्गतच्या ५४६ लाभार्थ्यांचे ५ लाख, ३५ हजार, ७२४़६८, उस्मानाबाद ग्रामीण अंतर्गत १२२०० लाभार्थ्यांचे १ कोटी, ८८ लाख, १९ हजार १९६ रूपये, तेर उपविभागांतर्गत १७३८८ लाभार्थ्यांचे २ कोटी, ९२ लाख, २८ हजार, ८५४ रूपये, भूम उपविभागांतर्गतच्या ७८९२ लाभार्थ्यांचे ९७ लाख, ८२ हजार, ९८़३, परंडा उपविभागांतर्गतच्या ५०४८ लाभार्थ्यांचे ७६ लाख, ३३ हजार, ९० रूपये, कळंब उपविभागांतर्गतच्या २२०७० लाभार्थ्यांचे ३ कोटी, ४५ लाख, ६२ हजार ८०७ रूपये, वाशी उपविभागांतर्गत ८९९५ लाभार्थ्यांना १ कोटी, २७ लाख, १२ हजार ३०० रूपये वीजबिल माफ झाले आहे़ तुळजापूर विभागात तुळजापूर उपविभागांतर्गत १९१३१ लाभार्थ्यांना २ कोटी, ६४ लाख, ६८ हजार, ८८६ रूपयांचे, उमरगा उपविभागांतर्गत १३४२ लाभार्थ्यांचे १ कोटी, ९५ लाख, ५७ हजार, १०१ रूपये, तर लोहारा उपविभागांतर्गत १०१४१ लाभार्थ्यांना १ कोटी, ४९ लाख, ८८ हजार, १२० रूपयांचे वीजबिल माफ करण्यात आले आहे़ एप्रिल, मे महिन्यात देण्यात आलेली वीजबिले तीन महिन्यातील बील व मिळालेल्या सवलीनुसार शून्य रक्कम दर्शवून देण्यात आले आहेत़ (प्रतिनिधी) थकबाकी भरायची कशी ? वीज वितरण कंपनीकडून जानेवारी ते मार्च या पहिल्या टप्प्यातील तीन महिन्यांच्या वीजबिल माफीचा ११६८२३ लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे़ तीन महिन्याचे वीजबिल माफ झाले असले तरी थकबाकीचा आकडा मात्र बिलावर आला आहे़ त्यामुळे नुकसानीने कंबरडे मोडलेल्या शेतकर्‍यांमध्ये ही थकबाकी भरायची कशी आणि खरीप हंगाम घ्यायचा कसा हा प्रश्न शेतकर्‍यांसमोर कायम आहे़

Web Title: 116823 Hail For Electricity Bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.