११६ संचालकांची बँकखाती गोठविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:44 IST2017-09-05T00:44:26+5:302017-09-05T00:44:26+5:30
जिल्ह्यातील काही विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांनी जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची थकबाकी भरली नसल्याने या सोसायट्यांच्या ११६ संचालकांचे बचत खाते जिल्हा बँकेने गोठविले असून, २२६ संचालकांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्या संदर्भातील प्रक्रिया बँकेने सुरू केली आहे़

११६ संचालकांची बँकखाती गोठविली
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील काही विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांनी जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची थकबाकी भरली नसल्याने या सोसायट्यांच्या ११६ संचालकांचे बचत खाते जिल्हा बँकेने गोठविले असून, २२६ संचालकांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्या संदर्भातील प्रक्रिया बँकेने सुरू केली आहे़
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नुकतीच आढावा बैठक पार पडली़ या बैठकीत बँकेच्या कर्जाच्या वसुलीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली़ त्यामध्ये अनेक संस्थांकडे मोठ्या प्रमाणात बँकेची थकबाकी असल्याचे स्पष्ट झाले़ ३० जून २०१७ अखेर १४६ अवसायनातील संस्थांकडे ५५५०़१८ लाख रुपयांची थकबाकी आहे़ जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांकडे असलेल्या थकबाकीचाही यावेळी आढावा घेण्यात आला़ यामध्ये न्यायालयाचे अवार्ड प्राप्त व थकबाकीतील संस्थेच्या ७८२ संचालकांपैकी ३५५ संचालकांच्या मालमत्तेचा शोध घेऊन त्यापैकी २२६ संचालकांच्या मालमत्तेवर बँक कर्जाचा बोजा नोंद घेण्या संदर्भातील पत्र बँकेच्या विशेष वसुली अधिकाºयांना देण्यात आले होते़ त्या अनुषंगाने ३७ संचालकांच्या मालमत्तेवर बोजा नोंद करून या संदर्भातील मालमत्तेची कागदपत्रे विशेष वसुली अधिकाºयांनी महसूल विभागाकडून हस्तगत केली आहेत़ याशिवाय ११६ संचालकांचे अवार्डच्या अनुषंगाने बँकेतील बचत खाते गोठविण्यात आले आहे. जोपर्यंत हे संचालक बँकेकडे थकबाकी भरणार नाहीत, तोपर्यंत या खात्यावर त्यांना कोणत्याही प्रकारचा व्यवहार करता येणार नाही़