जिल्ह्यात ११६ अंगणवाड्यांना मिळणार स्वतंत्र इमारती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:05 IST2021-07-08T04:05:22+5:302021-07-08T04:05:22+5:30

फुलंब्री : जिल्हाभरात भाड्याच्या घरात चालणाऱ्या अंगणवाड्यांना आता स्वतंत्र इमारती मिळणार आहेत, यासाठी जिल्हा परिषदेकडून जिल्हा वार्षिक योजनेमध्ये ११६ ...

116 Anganwadas will get separate buildings in the district | जिल्ह्यात ११६ अंगणवाड्यांना मिळणार स्वतंत्र इमारती

जिल्ह्यात ११६ अंगणवाड्यांना मिळणार स्वतंत्र इमारती

फुलंब्री : जिल्हाभरात भाड्याच्या घरात चालणाऱ्या अंगणवाड्यांना आता स्वतंत्र इमारती मिळणार आहेत, यासाठी जिल्हा परिषदेकडून जिल्हा वार्षिक योजनेमध्ये ११६ नवीन अंगणवाड्यांकरिता दहा कोटींचा निधी मंजूर केला आहे, तसेच या इमारतींचे बांधकाम ९ महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील मुलांना लहान वयात सकस आहार मिळावा, त्याचे कुपोषण होता कामा नये म्हणून शासनाने १९७४ मध्ये बालवाड्या सुरू केल्या. नंतर १९९८ मध्ये अंगणवाडीमध्ये त्यांचे रूपांतर करण्यात आले. यात बालकांसोबत गरोदर महिला, किशोरवयीन मुली यांचीही काळजी घेतली जाऊ लागली. जिल्हाभरात अनेक अंगणवाड्या या भाड्याच्या खोल्यांमध्ये सुुरू असल्याने नवीन इमारतींची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. लोकमतने यावर वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा परिषदेने याची दखल घेत ११६ नवीन इमारती बांधण्याकरिता निधीला मंजूरी दिली आहे. या मधील दहा अंगणवाड्यांकरीता ९ लाख ३५ हजार, तर उर्वरित १०६ अंगणवाड्यांसाठी प्रत्येकी ८ लाख ५० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. या इमारतींचे बांधकाम येत्या ३१ मार्च २०२२ पर्यंत करण्याचे पत्रकात नमूद आहे. यासाठी स्थळपाहणी अहवाल सकारात्मक येणे गरजेचे आहे.

चौकट

नवीन इमारत मिळणाऱ्या तालुकानिहाय अंगणवाड्या

फुलंब्री -१९, औरंगाबाद-१९, सिल्लोड-१७, पैठण- ०८, वैजापूर- १३, गंगापूर- १३, खुलताबाद-११, कन्नड -१३, सोयगाव- ०३

Web Title: 116 Anganwadas will get separate buildings in the district