शिक्षकांच्या बदल्यांसाठी ११५ अर्ज
By Admin | Updated: May 13, 2014 01:06 IST2014-05-12T23:52:16+5:302014-05-13T01:06:47+5:30
कळमनुरी : पुढील आठवड्यात शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू होणार आहे.

शिक्षकांच्या बदल्यांसाठी ११५ अर्ज
कळमनुरी : पुढील आठवड्यात शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू होणार आहे. शिक्षण विभागाने विनंती बदल्यांसाठी शिक्षकांकडून अर्ज मागविले होते. जिल्हा व तालुकांतर्गत बदल्यासाठी ११५ शिक्षकांचे अर्ज गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आले आहेत. जिल्हाअंतर्गत शिक्षकांच्या बदल्या १७ ते २३ मे दरम्यान होणार आहेत. तालुकाअंतर्गत प्रशासकीय व विनंती बदल्या २६ ते ३१ मे दरम्यान होणार आहेत. तालुका व तालुकाबाह्य बदल्यांसाठी शिक्षकांकडून बदल्यांचे अर्ज मागविण्यात आले होते. ७० शिक्षकांनी तालुका बाह्यसाठी तर ४५ शिक्षकांनी तालुकाअंतर्गत बदल्यांसाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात अर्ज सादर केले आहेत. कळमनुरी तालुकाबाह्य बदलीसाठी ७५ शिक्षकांनी अर्ज सादर केले. त्यापैकी यातील ९० टक्के शिक्षकांनी वसमत तालुक्यात जाण्याची पसंती दर्शवली आहे. विनंती बदल्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू असून तालुकाबाह्य विनंती बदल्यांसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांच्या याद्या दोन दिवसांत शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर करण्यात येणार आहेत. (वार्ताहर)