११३ जणांनाच मिळणार ‘पंतप्रधान रोजगार’
By Admin | Updated: August 10, 2016 00:28 IST2016-08-10T00:14:51+5:302016-08-10T00:28:11+5:30
औरंगाबाद : पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेचा लाभ जिल्ह्यातील अवघ्या ११३ बेरोजगारांना मिळणार आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातून

११३ जणांनाच मिळणार ‘पंतप्रधान रोजगार’
औरंगाबाद : पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेचा लाभ जिल्ह्यातील अवघ्या ११३ बेरोजगारांना मिळणार आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातून तीन हजारांवर बेरोजगारांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले असले तरी उद्दिष्टात मोठी घट झाल्याने उद्योजक बनण्याचे अनेकांचे स्वप्न भंगणार आहे.
जिल्हा उद्योग केंद्र आणि खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे पंतप्रधान रोजगारनिर्मिती योजना राबविली जाते. यंदा जिल्हा उद्योग केंद्राला ६६, तर खादी ग्रामोद्योग मंडळाला ४७, अशा ११३ प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. उद्योग केंद्राला १ कोटी ३१ लाख, तर ग्रामोद्योग मंडळाला अवघा ९५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. अशा प्रकारे जिल्हाभरातील ११३ लाभार्थ्यांना २ कोटी २६ लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे. गरजू व्यक्तींना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी या योजनेचे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी बेरोजगार करीत आहेत.
‘दुकानदारी’ बंद
पंतप्रधान रोजगारनिर्मिती योजनेची अर्ज प्रक्रिया यंदा प्रथमच आॅनलाईन करण्यात आली आहे. खादी ग्रामोद्योग मंडळाच्या संकेतस्थळावर त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग मंडळाकडे आतापर्यंत तीन हजारावर बेरोजगारांनी अर्ज केले आहेत. आॅनलाईन प्रक्रियेमुळे या योजनेत चालणारी दलालांची दुकानदारी बंद झाली आहे.