महिनाअखेरपर्यंत ११०० कोटींचे रिफंड
By Admin | Updated: January 18, 2016 00:23 IST2016-01-18T00:23:38+5:302016-01-18T00:23:38+5:30
देशभरातील ६५ हजारांवर छोट्या करदात्यांचे सुमारे १ हजार १४८ कोटी रुपये महिनाअखेरीस परत मिळणार आहेत. करदात्यांचे प्रश्न सोडविण्याच्या केंद्राच्या

महिनाअखेरपर्यंत ११०० कोटींचे रिफंड
नवी दिल्ली : देशभरातील ६५ हजारांवर छोट्या करदात्यांचे सुमारे १ हजार १४८ कोटी रुपये महिनाअखेरीस परत मिळणार आहेत. करदात्यांचे प्रश्न सोडविण्याच्या केंद्राच्या सूचनेनुसार त्यांना परत करावयाच्या रकमा त्वेरेने परत कराव्यात असे आयकर खात्याला सांगण्यात आले आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडील आकडेवारीनुसार ३१ जानेवारीपर्यंत ही रक्कम करदात्यांना परत करावयाची आहे. कर निर्धारण वर्ष २०१३-१४ व २०१४-१५ मधील ५ हजारांपेक्षा कमी ज्यांचा परतावा आहे अशा करदात्यांना तो परत मिळणार आहे.
प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष ए.के. जैन यांनी अलीकडेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची राष्ट्रीय स्तरावर बैठक घेतली. त्यात हा मुद्दा पुढे आला. त्यानंतर ३१ जानेवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत परताव्याचा निर्णय झाला. महसूल सचिव हसमुख अडिया यांनी शनिवारी सांगितले की, चालू आर्थिक वर्षात खात्याने १.९८ करदात्यांचे ६५ हजार कोटी रुपये परत केले आहेत. करदात्यांचा खरा परतावा त्यांना त्वरित दिला जावा अशी केंद्राची सूचना असून त्याचे पालन केले जात आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रामाणिक करदात्यांसाठी परतावा ही महत्त्वाची बाब असून त्यांना तो वेळेवर मिळाला पाहिजे, याची काळजी वित्त मंत्रालय व आयकर खात्याने घेतली पाहिजे.